chandrayaan-3 landing : प्रकाश राज यांच्यावर युजर्स पडले तुटून, मीम आलं अंगलट

रोहिणी ठोंबरे

22 Aug 2023 (अपडेटेड: 22 Aug 2023, 02:03 PM)

‘चांद्रयान-3’ शी जोडलेला फोटो शेअर केल्यामुळे अभिनेता प्रकाश राज यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. अशा परिस्थितीत आता त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘चांद्रयान-3’ शी संबंधित फोटो शेअर करणं प्रकाश राज यांना महागात पडलं.

Mumbaitak
follow google news

Prakash Raj Trolled By Users : ‘चांद्रयान-3’ शी जोडलेला फोटो शेअर केल्यामुळे अभिनेता प्रकाश राज यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. अशा परिस्थितीत आता त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, ‘द्वेषाला नेहमी द्वेषच दिसतो. मी आर्मस्ट्राँग टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका विनोदाचा संदर्भ देत होतो, जे आपल्या केरळच्या चहा विक्रेत्यावर होतं. ट्रोलर्सनी कोणत्या चहा विक्रेत्याला पाहिलं? जर तुम्हाला विनोद समजत नसेल तर हा विनोद तुमच्यावरच आहे.’ (Prakash Raj Is Getting Trolled Over The First Photo On The Moon Meme)

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, ‘चांद्रयान-3’ शी संबंधित फोटो शेअर करणं प्रकाश राज यांना महागात पडलं. हा फोटो शेअर केल्यापासून ट्रोलर्स त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करत आहेत. चांद्रयान-3 मोहिमेची खिल्ली उडवल्याचा आरोप यूजर्स त्यांच्यावर करत आहेत.

Onion Price : ‘वाजपेयींचं सरकार पडले म्हणून इतके घाबरता का?’, बच्चू कडू मोदी सरकारवर कडाडले

प्रकाश राज यांनी शेअर केलेल्या फोटोत नेमकं आहे तरी काय?

प्रकाश राज यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये लुंगी आणि शर्ट घातलेले एक कार्टून कॅरेक्टर दोन जगमधून वर-खाली चहा ओतताना दिसत आहे. प्रकाश राज यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘विक्रमलँडरने चंद्रावरून पहिला फोटो पाठवला आहे.’ हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर करताच यूजर्सनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली.’

मोनालिसाची ही पेंटिंग जगात इतकी लोकप्रिय का, सम्राट नेपोलियनचं कनेक्शन काय?

शेअर केलेल्या पोस्टवर यूजर्सच्या संतापजनक प्रतिक्रिया!

प्रकाश राज यांनी शेअर केलेला हा फोटो पाहिल्यानंतर यूजर्सनी याला अंध विरोध असल्याचं म्हटलं आहे. एका यूजरने म्हटलं आहे की, ‘असे फोटो शेअर करून तुम्ही आमच्या शास्त्रज्ञांची खिल्ली उडवत आहात.’ तर चार्ली नावाच्या हँडलने लिहिले की, ‘चांद्रयान मिशन भाजपचे नाही तर इस्रोचे आहे. यात यश मिळाले तर ते कोणत्याही पक्षाचे नव्हे तर भारताचे यश असेल. तुम्हाला हे मिशन अयशस्वी का करायचे आहे. भाजप हा केवळ सत्ताधारी पक्ष आहे. एक दिवस ते निघून जाईल. इस्रो अनेक वर्षांपर्यंत असेल आणि आम्हाला अभिमान वाटेल.’

Maharashtra Politics : शिंदेंची खेळी… 12 आमदार नियुक्तीत ‘मविआ’ला कसा बसला झटका!

दुसऱ्या एका युजरने लिहिलं की, ‘मोदीजींना विरोध करण्यात तुम्ही इतके आंधळे झाले आहात का की तुम्ही इस्रोच्या वैज्ञानिकांच्या मेहनतीची खिल्ली उडवत आहात. आपल्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या नावावर असलेल्या विक्रम लँडरचीही तुम्ही निंदा करत आहात.’

नीतू खंडेलवाल नावाच्या युजरने लिहिलं, ‘चांद्रयान-३ मोहीम भारतासाठी आहे. भारतीय असल्यामुळे या प्रगतीचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. याआधीही प्रकाश राज यांनी अशी आक्षेपार्ह विधाने केली आहेत.’

    follow whatsapp