Sachin Pilgaonkar : अभिनेते सचिन पिळगांवर हे त्यांच्या विधानाने नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या विधानाची देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते. याचा अनुभव हा नेटकऱ्यांना याआधी आला होता. हिंदीतील सुप्रसिद्ध चित्रपट शोले या सिनेमातील गब्बरची भूमिका केलेल्या नटाला संवाद कसा करायचा हे आपणंच शिकवल्याचं त्यांचंच वक्तव्य होतं. त्यानंतर आता त्यांनी थेट भाषेविषयी वक्तव्य केल्याने ते चांगलेच चर्चेत आले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : गौतमीला कधी उचलणार? चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नावर गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया म्हणाली, माझ्याकडून काहीही...
महाराष्ट्र उर्दू साहित्य अकादमीचं महोत्सव साजरा करण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर बहार ए उर्दू या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला जावेद अख्तर यांच्यापासून अनेक दिग्गजांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. तेव्हा सचिन पिळगांवकरही त्या ठिकाणी होते. तेव्हा शेखर सुमन यांनी सचिन पिळगांवकरांची मुलाखत घेतली असता, सचिन पिळगांवकरांनी उर्दू भाषेवरील प्रेम व्यक्त केलं. मात्र, हे प्रेम व्यक्त केलं असता, नेटकरी त्यांना ट्रोल करू लागले आहेत.
माझी मातृभाषा ही मराठी पण उर्दू...
सचिन पिळगांवकर म्हाणाले की, माझी मातृभाषा ही मराठी आहे. पण मी विचार उर्दू भाषेतूनच विचार करतो. मला माझ्या बायकोने किंवा कोणीही रात्री 3 वाजता जरी उठवलं तरीही मी उर्दू भाषेतच उठतो. ते एवढ्यावरच न थांबता म्हणाले की, मी उर्दू भाषेतच उठतच नाहीतर झोपतोही, माझ्या उर्दूवरील प्रेम माझ्या बायकोलाच माहिती आहे, असे ते म्हणाले. तेव्हा शेखर सुमन यांनी सचिन पिळगांवकरांचं कौतुक केलं.
हे ही वाचा : लग्नाचं आमिष दाखवून शरीरशोषण, लग्न दुसरीसोबत, मावशीचे भाच्यावरच धक्कादायक आरोप, नेमकं प्रकरण काय?
सचि पिळगांवकरांनी केलेले हे वाक्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच वक्तव्यावर नेटकऱ्यांनी टीका टिपण्ण्या केल्या आहेत. एका नेटकऱ्यांनी नेमकं काय म्हणायचंय? असा सवाल केला. तर एकाने यालाच वैचारिक दिवाळखोरी म्हणायची, असं म्हटलंय.
ADVERTISEMENT
