Shahrukh Khan : शाहरुखला रुग्णालयात दाखल करण्याचं नेमकं कारण काय?

मुंबई तक

22 May 2024 (अपडेटेड: 22 May 2024, 10:54 PM)

Shahrukh khan Hospitalised : मंगळवारी अहमदाबादमध्ये कोलकत्ता विरुद्द हैदराबादमध्ये प्लेऑफचा सामना खेळला गेला होता. या सामन्यासाठी शाहरुख खान दोन दिवसांसाठी अहमदाबादला आला होता. हा सामना संपल्यानंतर शाहरुख टीमसोबत रात्री उशिरा अहमदाबादच्या आयटीसी नर्मदा हॉटेलमध्ये पोहोचला.

 shah rukh khan hospitalised in ahmedabad kd hospital bollywod news

शाहरूख खानला डीहाड्रेशनचा त्रास झाला होता.

follow google news

Shahrukh khan Hospitalised : बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्याला अहमदाबाद (Ahemadabad) येथील केंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सूरू असूव त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पण नेमकं शाहरुखला (Shahrukh khan) झालं काय? आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ का आली? हे जाणून घेऊयात.  (shah rukh khan hospitalised in ahmedabad kd hospital bollywod news)  

हे वाचलं का?

शाहरूख खानला डीहाड्रेशनचा त्रास झाला होता. त्यामुळेच त्याला अहमदाबादच्या केडी रूग्णालयात दाखळ करण्यात आले होते. मात्र उपचार केल्यानंतर शाहरुखला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे त्याच्या चाहत्यांच्या जीवात जीव आला आहे. 

हे ही वाचा : भाजपला 272 जागा मिळाल्या नाही तर.. पवारांचं मोठं विधान

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी अहमदाबादमध्ये कोलकत्ता विरुद्द हैदराबादमध्ये प्लेऑफचा सामना खेळला गेला होता. या सामन्यासाठी शाहरुख खान दोन दिवसांसाठी अहमदाबादला आला होता. हा सामना संपल्यानंतर शाहरुख टीमसोबत रात्री उशिरा अहमदाबादच्या आयटीसी नर्मदा हॉटेलमध्ये पोहोचला. त्यानंतर सकाळी शाहरुखची तब्येत अचानक बिघडली होती. त्यामुळे दुपारी 1 वाजताच्या सुमारास त्याला केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर शाहरुखला डिस्चार्ज देण्यात आला.सध्या शाहरुखची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जातंय, डॉक्टरांनी शाहरुखला काही काळ विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

    follow whatsapp