रूग्णांच्या मदतीसाठी पुन्हा सोनू सूदचा पुढाकार

लॉकडाऊनच्या काळात गरजूंच्या मदतीसाठी अभिनेता सोनू सूद वेळेवर धावून आला. वेळोवेळी लोकांची मदत करत सोनू खऱ्या आयुष्यातंही हिरो बनला. तर आता पुन्हा एकदा सोनूने लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. सोनूने नुकतंच एक अॅएप लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. Let's save lives.Your own Blood Bank coming soon.@IlaajIndia @SoodFoundation pic.twitter.com/ZaZIafx46Y — sonu sood (@SonuSood) March 3, […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:00 AM • 06 Mar 2021

follow google news

लॉकडाऊनच्या काळात गरजूंच्या मदतीसाठी अभिनेता सोनू सूद वेळेवर धावून आला. वेळोवेळी लोकांची मदत करत सोनू खऱ्या आयुष्यातंही हिरो बनला. तर आता पुन्हा एकदा सोनूने लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. सोनूने नुकतंच एक अॅएप लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे.

हे वाचलं का?

Sonu For You या नावाने हे अॅनप असल्याची आहे. यामध्ये ज्या व्यक्तीला रक्ताची गरज आहे तो आणि रक्त दाता थेट एकमेकांशी जोडले जातील. म्हणजेच हे अॅसप रक्त दाता आणि रुग्णांमध्ये एका दुव्याप्रमाणे काम करेल. या अॅ पच्या माध्यमातून कोणत्या रुग्णाला तसंच कोणत्या ठिकाणी रक्ताची आवश्यकता आहे हे समजण्यास मदत होणार आहे.

सोनू सूदने ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. सोनू त्याच्या ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीयोमध्ये त्याने अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधलंय. या व्हिडीयोमध्ये माहिती दिलीये की, रोज सुमारे 12 हजार लोकांचा मृत्यू हा केवळ गरजेच्या वेळी रक्त न मिळाल्याने होतो. त्यामुळे आपली 20 मिनिटे त्या 12 हजार लोकांचा जीव वाचवण्यासाठी द्या. दरम्यान लोकांचा जीव वाचवण्यासाठी आपल्याला डॉक्टर होण्याची आवश्यकता नाही. तुम्ही रक्तदान देखील करू शकता.

    follow whatsapp