The kerala Story ने कमाईत सलमान खानच्या चित्रपटाला टाकलं मागे, 9 दिवसात…

मुंबई तक

14 May 2023 (अपडेटेड: 14 May 2023, 09:51 AM)

The Kerala story Box Office Collection : ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाने बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातलाय.या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फक्त 9 दिवसात शंभरी गाठत सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) सिनेमालाही मागे टाकले आहे.

the kerala story box office collection crosses 100 crore in 9 days

the kerala story box office collection crosses 100 crore in 9 days

follow google news

The Kerala story Box Office Collection : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala story) स्टारर अभिनेत्री अदा शर्माच्या (Adah sharma) सिनेमाने बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातलाय.या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फक्त 9 दिवसात शंभरी गाठत सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) सिनेमालाही मागे टाकले आहे. आता तिसऱ्या आठवड्यात देखील हा सिनेमा अनेक रेकॉर्ड ब्रेक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा ”द काश्मिर फाईल्स” सिनेमाप्रमाणे बॉक्स ऑफिसवर कमाई करणार असल्याचाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.(the kerala story box office collection crosses 100 crore in 9 days beating salman khan kisi ka bhai kisi ki jaan)

हे वाचलं का?

‘द केरळ स्टोरी’ने (The Kerala story) पहिल्या शुक्रवारपेक्षा दुसऱ्या शुक्रवारी जास्त कमाई केली आहे.पहिल्या शुक्रवारी सिनेमाने 8.03 करोडचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या शुक्रवारी सिनेमाने 12.23 करोडची कमाई केली आहे. तर या सिनेमाने नवव्या दिवशी 19.50 करोड रूपयांचा कलेक्शन केले आहे. शनिवारच्या 9 व्या दिवसाचा आकडा पाहून सिनेमाने आतापर्यंत 113 करोडचा गल्ला जमवला आहे.

हे ही वाचा : नवाजुद्दीन सिद्दीकी संपवणार होता आयुष्य? नेमकं काय घडलं होतं?

तिसरा सर्वांत मोठा सिनेमा

सलमान खानच्या (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) सिनेमाने 110 करोडची कमाई केली होती. सलमानच्या या सिनेमाला ‘द केरळ स्टोरी’ने फक्त 9 दिवसात मागे टाकले आहे. कारण ‘द केरळ स्टोरी’ने शनिवारच्या 9 व्या दिवशी 113 करोडच्या कमाईचा पल्ला गाठला.
पठाण आणि तू झूठी मे मक्कार या सिनेमानंतर ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा 2023 या वर्षातला तिसरा सर्वांत मोठा कमाई करणारा सिनेमा ठरलाय.

सिनेमा ‘इतकी’ कमाई करणार?

पठाण सिनेमा 543 करोड रूपयांचे कलेक्शन करून वर्षातला सर्वांत मोठी फिल्म ठरलेला. तर तू झूठी मे मक्कार या सिनेमाचे नेट इंडिया कलेक्शन 147 करोड होते. आता ‘द केरळ स्टोरी’सिनेमाचे रविवारीचं कलेक्शन आणखीण 20 करोड होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ‘द केरळ स्टोरी’ एकूण कलेक्शम 131 किंवा 133 करोडच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : 14 वर्षांचा वनवास अन् रामसेतू, ‘आदिपुरुष’चा ट्रेलर पाहिलात का?

दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा सिनेमा असलेला ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala story) 5 मे रोजी रिलीज झाला होता. या सिनेमात बॉलिवुड अभिनेत्री अदा शर्मा मु्ख्य भूमिकेत आहे. या सिनेमाची खुप चर्चा आहे.

    follow whatsapp