IAS सृष्टी देशमुखची लव्ह स्टोरी, IAS नागार्जुनसोबत कशी झाली होती भेट?

मुंबई तक

• 03:51 PM • 21 Oct 2023

सृष्टी आणि नागार्जुन ही लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दोघंही उत्तराखंडमधील मसुरीलमधील लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय प्रशिक्षण काळातच त्यांची भेट झाली त्यानंतरच त्यांच्या लव्हस्टोरीला इथूनच सुरुवात झाली.

ias srishti deshmukh love story how did ias meet Nagarjuna?

ias srishti deshmukh love story how did ias meet Nagarjuna?

follow google news

UPSC IAS stories:  सध्याचा जमाना स्पर्धेचा असल्यामुळे यशस्वी झालेल्या लोकांकडून यशाचा एक मार्ग सांगण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक लोकांची आयुष्यही बदलून गेली आहेत. असाच यशाचा मार्ग सांगणारे काही आयएएस अधिकाही आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले आहे. त्यातीलच सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड प्रसिद्ध असलेले एक जोडपे म्हणजे आयएएस सृष्टी देशमुख (IAS Srushti Deshmukh) आणि आयएएस नागार्जुन गौडा (IAS Nagarjun Gowda) हे एक जोडपे आहे. त्यांचे सोशल मीडियावरही असंख्य फॅन फॉलोइंगही प्रचंड आहेत. हे लोकप्रिय आयएएस जोडपे गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकले होते. ही दोघंही लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC Exam) देऊन त्यामध्ये यशस्वी झालेली आहेत. त्यासाठी ही दोघं अनेकांना त्या परीक्षेसाठी प्रवृत्तही करत आहेत.

हे वाचलं का?

आयएएस सृष्टी देशमुख या 2019 च्या बॅचची आएएएस अधिकारी. त्या सध्या मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यातील गादरवारा येथे एसडीएम म्हणून उच्च पदावर काम करत आहेत. तर त्यांचे पती आयएएस नागार्जुन गौडा हेदेखील मध्य प्रदेश केडरचे 2019 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यामुळे या दोन आयएएस अधिकाऱ्यांची भेट कशी झाली आणि ही दोघं त्यांच्या विवाहबंधनात कशी अडकली याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली होती.

प्रशिक्षण काळातच प्रेम

लोकसेवा आयोगाची 2018 ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, सृष्टी आणि नागार्जुन दोघंही उत्तराखंडमधील मसुरीलमधील लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. त्या प्रशिक्षणावेळीच या दोघांची भेट झाली, आणि त्यांच्या लव्हस्टोरीला इथूनच सुरुवात झाली.

हे ही वाचा >> Vinayak Mete Nephew: दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुतण्याची आत्महत्या, नेमकं कारण काय?

प्रेमकहाणीला झाली सुरुवात

या दोघांची प्रेमकहाणी प्रशिक्षण काळात सुरु झाली तरी त्यांनी 2 वर्षांपेक्षा अधिक काळानंतर त्यांनी ऑगस्ट 2021 मध्ये एंगेजमेंट केली. त्यानंतर एप्रिल 2022 मध्ये दोघंही विवाहबंधनात अडकले. त्यानंतर आता दोघंही मध्य प्रदेशामध्ये सेवा बजावत आहेत. सोशल मीडियावर ते अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आणि सेवा कार्यकाळातील त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

घरातूनच मिळाला यशचा मार्ग

आयएएस सृष्टी या भोपाळच्या असून त्यांनी आपले शिक्षण भोपाळमध्येच पूर्ण केले आहे. त्यांचे कुटुंब भोपाळमधील कस्तुरबानगरमध्ये राहते. तर सृष्टी देशमुखचे वडील जयंत देशमुख हे अभियंता आहेत. तर आई सुनीता देशमुख या शिक्षिका आहेत. आयएएस सृष्टी यांचे केमिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले आहे. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली होती. तर 2018 मध्ये सृष्टी देशमुखने वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी पहिल्याच प्रयत्नात ऑल इंडिया 5 वा रँक मिळवला होता.

हे ही वाचा >> फीसाठी पैसे नाही म्हणून विद्यार्थ्यांची आत्महत्या, जरांगे-पाटलाच्या सभेला लावलेली हजेरी!

द आन्सर रायटिंग

त्यानंतर त्यांचे ‘द आन्सर रायटिंग’ नावाचे पुस्तकंही आले आहे. त्यामध्ये नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी तयारी आणि उत्तरे लिहिण्याच्या धोरणांचे तपशीलवार वर्णन केले आहे. इंस्टाग्रामवर तिचे 2.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. आयएएस नागार्जुन गौडा मूळचे कर्नाटकचे त्यांनी 2018 मध्ये हीच परीक्षा उत्तीर्ण झाले होते. यांचे Instagram वर 413K फॉलोअर्स आहेत. नागार्जुन यांनी आयएएस अधिकारी होण्यापूर्वी त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण घेतले होते.

    follow whatsapp