55 वर्षीय नवरदेव, अविवाहित असल्याचं सांगून 4 लग्न केले, पण तिसऱ्या पत्नीने चांगलीच अद्दल घडवली

Crime News :

Crime News

Crime News

मुंबई तक

• 07:00 AM • 13 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

55 वर्षीय नवरदेव, अविवाहित असल्याचं सांगून 4 लग्न केले

point

पण तिसऱ्या पत्नीने चांगलीच अद्दल घडवली

Crime News : छत्तीसगडमधील दुर्ग पोलिसांनी गुजरातच्या अहमदाबाद येथून 55 वर्षीय बिरेन कुमार सोलंकी या फसवणूक करणाऱ्या नवरदेवाला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बिरेन स्वतःला अविवाहित सांगून चार महिलांशी लग्न करून त्यांच्याकडून लाखोंचे पैसे आणि दागिने उकळले आहेत. सर्वात आश्चर्य म्हणजे बिरेनचे तीन मोठे मुलं आहेत आणि त्यातील मोठ्या मुलाचे वय 35 वर्षे आहे. तरीही त्याने स्वतःला ‘अविवाहित’ असल्याचे सांगत महिलांना विश्वासात करुन लग्न केले.

हे वाचलं का?

दुर्गच्या शिक्षिकेने बिरेन कुमारचा पर्दाफाश केला

या प्रकरणाचा भंडाफोड दुर्ग येथील एका महिला शिक्षिकेमुळे झाला. पीडित शिक्षिकेने पोलिसांकडे तक्रार देताना सांगितले की, ती आणि बिरेन चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. 2023 मध्ये दोघांचे लग्न झाले. लग्नावेळी बिरेन गुजरातहून एकटाच आला आणि वऱ्हाड न आणण्याचे कारण म्हणून ट्रेनची तिकीट मिळाली नसल्याचे सांगितले. लग्नानंतर त्याने शिक्षिकेला सतत दिशाभूल करत 32 लाख रुपये आणि 12 लाखांचे दागिने घेतले. तपासादरम्यान पोलिसांना समजले की बिरेन यापूर्वीही अनेक महिलांशी लग्न करून त्यांची फसवणूक करत होता. त्यानंतर अहमदाबादमधून त्याला ताब्यात घेण्यात आले.

ऑनलाइन जाहिरात देऊन केली फसवणूक

2019 मध्ये बिरेनने विवाहासाठी ऑनलाइन मॅट्रिमोनियल जाहिरात दिली होती. त्याच जाहिरातीमधून दुर्गच्या शिक्षिकेची त्याच्याशी ओळख झाली. त्याने स्वतःला अविवाहित आणि एका प्रायव्हेट कंपनीत उच्च पदावर असल्याचे सांगितले. काही भेटीनंतर दोघांनी एका वर्षात लग्न करण्याचे ठरवले. शिक्षिका दुर्गला परतल्यानंतर बिरेनने लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा प्रस्ताव मांडला. तीही तयार झाली आणि 2020 ते 2023 दरम्यान दोघे एकत्र राहिले. या काळात आरोपीने आपल्या आधीच्या लग्नाबाबत आणि कुटुंबाबतची माहिती पूर्णपणे लपवून ठेवली.

3 मे 2023 रोजी दुर्गमधील एका हॉटेलमध्ये त्यांचे लग्न झाले. त्यानंतर शिक्षिका जेव्हा गुजरातला गेली, तेव्हा बिरेनने तिला ना आपल्या घरी नेले, ना आपल्या नातेवाईकांना भेटायला दिले. नंतर चौकशीत उघड झाले की तो ज्या गावाचे नाव सांगत होता, तिथे त्याचे कोणतेही कुटुंबच नाही. लग्नानंतर तो शिक्षिकेला एका वेगळ्या घरात घेऊन गेला आणि काही दिवसांत तिला पुन्हा दुर्गला पाठवले. दरम्यान घर घेण्याचे EMI, हप्ते, गोल्ड लोन अशा कारणांनी तो सतत पैशांची मागणी करत राहिला.

तिसऱ्या लग्नानंतर एक महिन्यातच चौथं लग्न

शिक्षिकेशी (तिसरी पत्नी) लग्न केल्यानंतर फक्त एका महिन्यात, जून 2023 मध्ये त्याने गुजरातमधील एका सरकारी महिला डॉक्टरशी चौथं लग्न केलं. त्यानंतर शिक्षिकेला त्याच्या पहिल्या दोन लग्नांची आणि तीन मोठ्या मुलांची माहिती मिळाली. मुलांचे वय अनुक्रमे 35, 27 आणि 25 वर्षे आहे.

पीडित शिक्षिकेच्या मते, आरोपीचे केवळ एका पत्नीशीच अधिकृतरीत्या घटस्फोट झाले होते. पैशांबद्दल बोलल्यावर बिरेन नेहमी शिवीगाळ करून ‘आपलं नातं नाहीच’ असं म्हणत असे. त्याने घर आणि दागिने विकल्याचा खोटा दावा केला होता. त्याचे आधार आणि मतदान ओळखपत्र वेगवेगळ्या नावांनी बनवलेले आढळले. बिरेनचे खरे नाव दिलीप सिंह झाला असे असल्याचे निष्पन्न झाले. मोहननगर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई : फेसबुकवर मैत्री, नंतर महिलेचा whatsapp वर अर्धनग्न होऊन व्हिडीओ कॉल, अन् व्हायरलची धमकी देत लुटलं

    follow whatsapp