Ladki Bahin Yojana: महिलांना किती तारखेला मिळणार आता 1500 रुपये?

Ladki Bahin Yojana : सरकारकडून आता महिलांना पुढील 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तर.

महिलांना 2500 रूपये दिवाळी बोनस जाहीर

ladki bahin yojana scheme only these women get benefit of diwali bonus of Rs 5500 in their account

मुंबई तक

17 Oct 2024 (अपडेटेड: 17 Oct 2024, 11:04 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडक्या बहिणींना आता पुढील हप्ता कधी मिळणार?

point

महिलांना आता निवडणुकीनंतर मिळणार पैसे?

point

तुमच्या खात्यात किती पैसे येणार?

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा होतात. अशाप्रकारे महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंत 7500 रूपये जमा झाले आहेत. या 7500 मध्ये सरकारने महिलांना 3000 रूपयांचा ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रितपणे भाऊबीजेच्या रूपात देण्यात आला.त्यानंतर आता पुढील हप्ता नेमका कधी आणि कोणत्या तारखेला मिळणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

हे वाचलं का?

ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच सरकारने नोव्हेंबर महिन्याचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ज्या महिलांना आधीच्या तीन महिन्याचे योजनेचे पैसे मिळाले होते. त्यांना चौथ्या हप्त्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रितपणे 3000 रूपये देण्यात आले. त्यामुळे महिलांना भाऊबीजेची ओवाळणी महिनाभर आधीच मिळाली. तर ज्या महिलांच्या खात्यात तीन हप्त्यापर्यंत एकही रूपया जमा झाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात चौथ्या हप्त्यात एकत्रितपणे 7500 रूपये जमा झाले. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana: 'या' महिलांनाच मिळणार 3000 रुपयांचा लाभ, पैसे कोणत्या खात्यात?

दरम्यान हे पैसे जमा झाल्यानंतर आता काही महिलांना सरकारकडून पुढील हप्ता कधी मिळणार याकडे डोळे लागून राहिले आहेत. सरकारकडून महिलांना दरमहा 1500 दिले जाणार आहेत. मात्र आता ते थेट डिसेंबर महिन्यातच मिळण्याची शक्यता आहे. कारण आता पुढील काही दिवस आचारसंहिता असल्याने निवडणुका पार पडेपर्यंत महिलांना पैसे मिळणार नाही. 

महिलांना कोणत्या अटी-शर्थी पूर्ण कराव्या लागणार? 

 ज्या महिलांचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत आहे. ज्या महिलांनी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे. तसेच ज्यांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहे. आणि या योजनेत सर्व नियम आणि अटींचं पालन केले आहे, अशा महिलांनाच पुढील हप्ता मिळणार आहे. ज्या महिला या अटीत बसतात त्याच महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्यालाल 1500 रुपये जमा होऊ शकतात. आता जर तुम्ही या अटीत बसत असाल तर तुमच्या खात्यात देखील पैसे जमा होणार आहेत. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'ची दिवाळी आणखी गोड, दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रच...

पण हे पैसे महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे. याची माहिती मिळू शकली नाही. सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारची तारीख जाहीर करण्यात आली नाही. 

    follow whatsapp