एक लिटरमागे पेट्रोल पंप मालक किती रुपये कमावतो? संपूर्ण गणित एका क्लिकवर

Petrol pump owners earning : एक लिटरमागे पेट्रोल पंप मालक किती रुपये कमावतो? संपूर्ण गणित एका क्लिकवर

Petrol pump owners earning

Petrol pump owners earning

मुंबई तक

• 07:55 AM • 07 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

एक लिटरमागे पेट्रोल पंप मालक किती कमावतो? संपूर्ण गणित एका क्लिकवर

point

पेट्रोल पंप सुरू करण्याचा खर्च किती?

Petrol pump owners earning : देशभरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने इंधन विक्रीचा व्यवसायही प्रचंड गतीने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंप (Fuel Pump) हा व्यवसाय आज ग्रामीण ते शहरी भागात स्थिर आणि नफा देणारा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. मात्र, पेट्रोल पंप सुरू करणे हे सहज शक्य नसते. त्यासाठी मोठं भांडवल, परवाने आणि कडक अटी पूर्ण कराव्या लागतात. पण एकदा हा व्यवसाय सुरू झाला, की तो दीर्घकाळ स्थिर उत्पन्न देणारा ठरतो.

हे वाचलं का?

पेट्रोल पंप सुरू करण्याचा खर्च

ग्रामीण भागात पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी किमान 20 लाख रुपये गुंतवणूक आवश्यक असते, तर शहरात ही गुंतवणूक 40 ते 50 लाख रुपये पर्यंत जाते. यात टाक्या, डिस्पेंसर, बांधकाम आणि इतर मूलभूत सुविधा यांचा खर्च समाविष्ट असतो. मोठ्या शहरांमध्ये ही गुंतवणूक 1 कोटी रुपयांहून अधिकही होऊ शकते. बँका पेट्रोल पंप उभारणीसाठी 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देतात.

1 लिटर पेट्रोलवर किती कमाई?

सध्या दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 94.77 रुपये प्रति लिटर आहे. या दरामधून पेट्रोल पंप मालकाला 4.39 रुपये प्रति लिटर एवढे कमिशन मिळते.

सरकारकडून हे कमिशन निश्चित केलेले असते. पंप मालकाला त्यावरून अधिक पैसे आकारता येत नाहीत.

पेट्रोलची बेस प्राईज — ₹52.84

केंद्र सरकारची एक्साइज ड्युटी — ₹21.90

राज्य सरकारचा VAT — ₹15.40

इतर चार्ज — ₹0.26

याप्रमाणे 1 लिटर पेट्रोलच्या किंमतीतून पंप मालकाला ₹4.39 कमिशन मिळते.

जर एखादा पंप दिवसभरात 5000 लिटर पेट्रोल विकतो, तर त्याला एकूण ₹21,950 इतके उत्पन्न मिळते. त्यातील अंदाजे अर्धा खर्च (पगार, वीज, देखभाल इ.) काढल्यानंतर दररोज ₹10,000 नफा सहज शक्य आहे.

1 लिटर डिझेलवर किती कमाई?

डिझेल विक्रीतही पंप मालकाला चांगला नफा मिळतो.

दिल्लीमध्ये 1 लिटर डिझेलवर —

VAT — ₹12.83

एक्साइज ड्युटी — ₹17.80

बेस प्राईद — ₹53.76

इतर चार्ज — ₹0.26

पंप मालकाला 1 लिटर डिझेलवर ₹3.02 कमिशन मिळते.

जर दिवसभरात 5000 लिटर डिझेल विक्री झाली, तर ₹15,100 इतके उत्पन्न मिळते. खर्च वजा करूनही दररोज ₹7,500 नफा सहज होतो.

एकूण दैनिक कमाई किती?

जर एखाद्या पंपावर पेट्रोल आणि डिझेल दोन्ही मिळून 10,000 लिटर विक्री होत असेल, तर पंप मालकाला सरासरी ₹15,000 दररोज नफा मिळू शकतो.

ही कमाई पंपाची लोकेशन, विक्रीचे प्रमाण आणि ग्राहकसंख्या यावर अवलंबून असते.

पेट्रोल पंप सुरू करण्याची प्रक्रिया

पेट्रोल पंप उघडण्यासाठी अर्जदार भारतीय नागरिक असावा आणि त्याचे वय 21 ते 60 वर्षे दरम्यान असावे.

शहरी भागासाठी 800-1200 चौ.मी. जमीन

ग्रामीण भागासाठी 1200-1600 चौ.मी. जमीन आवश्यक आहे.

जमीन स्वतःची किंवा भाड्याने घेतलेली असू शकते.

देशातील प्रमुख तेल कंपन्या IOCL, BPCL, HPCL, रिलायन्स वेळोवेळी नवीन डीलरशिपसाठी जाहिराती देतात. अर्ज ऑनलाइन सादर करावा लागतो, ज्यासाठी आधार, पॅन, जमीन कागदपत्रे, NOC आवश्यक असतात.

 

अधिक माहिती संबंधित कंपन्यांच्या वेबसाइटवर —

👉 www.iocl.com](https://www.iocl.com  

👉 www.reliancepetroleum.com](https://www.reliancepetroleum.com

पेट्रोल पंप हा मोठ्या गुंतवणुकीचा पण स्थिर नफा देणारा व्यवसाय आहे. सरकारकडून निश्चित केलेल्या कमिशनवर पंप मालक दररोज दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकतो. वाहनांची वाढती संख्या आणि इंधनाची कायमची मागणी यामुळे हा व्यवसाय पुढील अनेक वर्षे फायदेशीर राहणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ब्राझीलची मॉडेल ते मतचोरी राहुल गांधींचे पुराव्यांसह सनसनाटी आरोप, आता निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर

 

 

 

 

 

    follow whatsapp