Raj Thackeray : पुणे येथे मुंबई तक या वृत्तवाहिनाचा जय हिंद उत्सव सुरु असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत पार पडली. यादरम्यान राज ठकारे यांनी महाराष्ट्रावरती होणाऱ्या हिंदी सक्तीवर भाष्य केलं आहे. त्यावेळी बोलताना त्यांनी सध्याच्या केंद्र सरकारला आणि काँग्रेसलाही धारेवर धरलं आहे. भाजप आता हिंदीची सक्ती करत आहे तेच याआधी काँग्रेसही करू पाहत होती. मात्र, ते झालं नाही. आताही मी ते होऊ देणार नसल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मुंबई Tak जय हिंद उत्सव: 'आपली मराठी मुलं रिल्स...' हिंदी भाषेवर राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य
मुलाखतीला संबोधित करताना त्यांना मराठी भाषा, भाषेवर प्रांतरचना, भाषा आणि राजकारणावर विचारले असता, त्यांनी सरकारला आणि काँग्रेसलाही धारेवर धरलेलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी आपले राज्य आणि राज्याप्रती असणारा कडवटपणा असल्याचं ते म्हणाले आहेत. राज्य आपली भाषा वाढवत असते आणि समृद्ध करत असते. मात्र, महाराष्ट्राने आतापर्यंत देशाचाच विचार केलेला आहे. मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलंय की, आधी हात जोडा आणि ऐकत नसेल तर हात सोडा. कारण हात सोडल्याशिवाय पर्याय नाही. जर कोणी ऐकत नसेल तर हाच पर्याय आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी मुलाखतीच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील भाषा प्रांत रचनेवर भाष्य केलं आहे.
हिंदी राज्यभाषा नाही!
एका बाजूला प्रत्येक राज्य हे आपापल्या भाषेचाच विचार करते. कारण प्रत्येक राज्याला आपल्या भाषेचा अभिमान आहे. विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा का हवी? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. सरकारने हा निर्णय जरी मागे घेतला असला तरीही सरकार लपूनछपुन पाठ्यपुस्तकात हिंदीची सक्ती लादू शकेल, पण मी हे होऊ देणार नाही. यावेळी बोलताना त्यांनी हिंदी भाषेवरही भाष्य केलं. ते म्हणाले की, हिंदी राष्ट्रभाषा नाही. ज्याला ती भाषा शिकायची आहे त्याने ती भाषा शिकावी. जशी मराठी भाषा आहे, तशी जागतिक भाषा म्हणून इंग्रजी भाषेचा समावेश असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.
महाराष्ट्रावर हिंदी लादण्याचं नेमकं कारण काय?
त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकात हिंदी भाषेविषयी सक्ती कशासाठी सुरु आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांना जे शिकायचंय ते शिकतील त्यांच्यावर कोणतीही भाषा लादली जाऊ नये. आमच्या महाराष्ट्रात हिंदी लादण्याचा प्रयत्न याचसाठी करत आहात ना, ज्यातून तुमच्या हिंदी बातम्या, चित्रपट आम्ही पाहावेत. हल्लीचे मराठी रिल्सस्टार्स हिंदी भाषा वापरत आहेत, कशाला? मराठी भाषेचा वापर करा, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
हेही वाचा : मुंबई Tak जय हिंद उत्सव: निवडणुका, युती आणि बरंच काही.. राज ठाकरेंची Exclusive मुलाखत LIVE
काँग्रेस आणि भाजपवर राज ठाकरेंचा हल्ला
यानंतर बोलताना सरकावर आणि काँग्रेसवरही टीका केली आहे. ते म्हणाले की, जेव्हा काँग्रेस सरकार सत्तेत होतं त्यांनीही हेच केलं होतं. पण तेव्हा काहीही झालं नाही. ते होऊ दिलं नाही. आजही भाजप तेच करू पाहत आहे. मात्र, मी ते या महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
