पुणे: मुंबई Tak जय हिंद उत्सव या विशेष कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. ज्यामध्ये त्यांनी एक मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रातून ठाकरे आणि पवार ब्रँड संपविण्याचा प्रयत्न चालला आहे. असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून मूळ पक्ष हे त्या नेत्यांच्या हातातून गेल्यानंतर महाराष्ट्रातून ठाकरे-पवार ब्रँड नामशेष करण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असा सवाल अनेक जण विचारत आहेत. हाच प्रश्न राज ठाकरे यांना आजच्या मुलाखतीत विचारण्यात आला. ज्याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी हे म्हटलं की, हे दोन्ही ब्रँड महाराष्ट्रातून संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण तो ब्रँड संपणार नाही.
पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले
प्रश्न: दिल्लीमध्ये जेव्हा-केव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला जातो. तेव्हा दोन आडनावं प्रकर्षाने येतात ठाकरे आणि पवार.. सध्याच्या परिस्थितीत या दोन्ही आडनावांचा जो ब्रँड आहे तो संपवण्याचा प्रयत्न चाललाय का?
राज ठाकरे: ठाकरे-पवार ब्रँड संपविण्याचा प्रयत्न चाललाय यात काही वादच नाही. निश्चित... पण तो संपणार नाही. हे ही लिहून द्यायला तयार आहे मी. तो संपणार नाही..
हे ही वाचा>> मुंबई Tak जय हिंद उत्सव: 'आपली मराठी मुलं रिल्स...' हिंदी भाषेवर राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य
या सगळ्यात आमचे आजोबा पहिला इम्पॅक्ट जर महाराष्ट्रावर म्हटला तर प्रबोधनकार ठाकरे. त्यानंतरचा इम्पॅक्ट पाहिला तर बाळासाहेब ठाकरे. त्या बरोबरीने तुम्ही संगीतात बघितलं किंवा इतर क्षेत्रात तर माझ्या वडिलांचं श्रीकांत ठाकरे.. त्यानंतर मी एक येतो, उद्धव एक येतो.
आता प्रश्न असा आहे की, यामध्ये वैयक्तिक येतातच.. पण शेवटी आडनाव असतंच. ती गोष्ट म्हणजे.. आडनाव हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.
हिंदी भाषा सक्तीवरून राज ठाकरेंनी केली तुफान टीका
राज्य सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाविषयीचा निर्णय घेतला होता. मात्र, याला मनसेनं परिपूर्ण विरोध दर्शवला. त्यानंतर मुलाखतीदरम्यान, राज ठाकरे यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, 'मी हे होऊनच देणार नाही. सरकारने जरी हा निर्णय मागे घेतला असला, तरीही मी इतर भाषांची पुस्तक शाळांपर्यंत पोहोचवून देणार नाही.'
त्यानंतर त्यांनी हिंदी भाषेवर आपलं मत मांडलं की, 'हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. जशी मराठी राजभाषा आहे. जशी जागतिक पातळीवर इंग्रजी ही भाषा आहे. या दोन महत्त्वपूर्ण भाषा आहेत. ज्याला हिंदी शिकायची आहे त्याने ती भाषा शिकावी. आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये इतर तिसरी कोणती भाषा होती का? ज्याला हिंदी भाषा शिकावी वाटते त्याने ती भाषा शिकावी', असे म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
ADVERTISEMENT
