Crime News: एका राजकीय पक्षाच्या जिल्हा स्तरीय व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अश्लील व्हिडीओ आणि आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याची बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील हापुडमध्ये समाजवादी पक्षाच्या जिल्हास्तरीय व्हॉट्सअॅप ग्रुप 'समाजवादी पार्टी परिवार' मध्ये बुधवारी रात्री उशिरा हे व्हिडीओ आणि ऑडिओ व्हायरल झाले. या ग्रुपच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.
ADVERTISEMENT
पक्षाच्या प्रतिमेला कलंकित करणारं कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार, हापुडमध्ये समाजवादी पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष्यांनी 'समाजवादी पार्टी परिवार' नावाने एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला. यामध्ये जिल्हा, नगर आणि ब्लॉक स्तरावरील समाजवादी पार्टीचे बरेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ग्रुपमधीलच एका सदस्याच्या नंबरवरून आक्षेपार्ह आणि अश्लील क्लिप्स शेअर केल्या गेल्या. त्यानंतर, ग्रुपमधील इतर बऱ्याच सदस्यांनी ग्रुपच्या अॅडमिनला टॅग करून कठोर कारवाईची मागणी केली. महिला समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघटनेच्या प्रतिष्ठेला आणि समाजवादी पक्षाच्या प्रतिमेला कलंकित करणारं कृत्य असल्याचं सांगितलं आहे.
हे ही वाचा: मुंबईची खबर: वांद्रे-वर्सोवा सी लिंकचं काम सुरू होणार... 'या' मार्गावरील प्रवास आता काही मिनिटांतच पूर्ण होणार!
जिल्हाध्यक्षांनी काय सांगितलं?
हापुडमध्ये समाजवादी पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तेजपाल यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, या घटनेची लेखी तक्रार सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. आपला संशय व्यक्त करताना त्यांनी सांगितलं की, प्राथमिक दृष्ट्या हे प्रकरण हॅकिंगशी संबंधित असल्याचे दिसून येत आहे. सध्या, प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता जिल्हा संघटनेने तातडीने ग्रुप अॅडमिनकडून यासंबंधी रिपोर्ट मागवला.
हे ही वाचा: 'अबकी बार मोदी सरकार', घोषणेचे निर्माते पियुष पांडे यांचं निधन, जाहिरात क्षेत्रातील बाप माणूस हरपला
दोषी व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी
समाजवादी पार्टीचे वर्तमान जिल्हाध्यक्ष आनंद गुर्जर यांनी हे प्रकरण पक्ष शिस्तीच्या विरोधात असल्याचं सांगितलं. ते पुढे म्हणाले की, "या ग्रुपचा पक्षाशी काहीच संबंध नाही आणि पक्षाच्या नावाने तयार केलेल्या ग्रुपमध्ये अश्लील क्लिप्स व्हायरल करून पक्षाची प्रतिमा खराब करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. यासंबंधी नोटिस जाहीर करून स्पष्टीकरणाची मागणी करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन आणि समाजवादी पार्टीचे नेते तेजपाल प्रमुख यांना तीन दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आलं आहे. संशयास्पद नंबरची चौकशी सायबर सेलकडे सोपवण्यात आली असून ज्या नंबरवरून हे आक्षेपार्ह कंटेंट व्हायरल करण्यात आले तो नंबर ग्रुपमधून काढून टाकण्यात आला आहे."
ADVERTISEMENT










