मुंबईची खबर: वांद्रे-वर्सोवा सी लिंकचं काम सुरू होणार... 'या' मार्गावरील प्रवास आता काही मिनिटांतच पूर्ण होणार!
वांद्रे-वर्सोवा सी लिंकच्या बांधकामासाठी उपकरणे पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 17 किलोमीटर लांबीचा वांद्रे-वर्सोवा सी लिंक समुद्रात खोलवर बांधला जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वांद्रे-वर्सोवा सी लिंकचं काम सुरू होणार...
'या' मार्गावरील प्रवास आता काही मिनिटांतच पूर्ण होणार!
Mumbai News: मुंबईच्या दुसऱ्या सी लिंकचं बांधकाम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे. वांद्रे-वर्सोवा सी लिंकच्या बांधकामासाठी उपकरणे पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 17 किलोमीटर लांबीचा वांद्रे-वर्सोवा सी लिंक समुद्रात खोलवर बांधला जात आहे. पावसाळ्याच्या काळात समुद्राखाली कोणत्याही प्रकारच्या कामासाठी परवानगी नसल्याने, सी लिंकचं काम थांबवण्यात येतं.
हवामान खात्याकडून काही दिवसांपूर्वीच मान्सून संपल्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. पावसाळ्यात चार महिने या प्रोजेक्टचं काम बंद ठेवल्यानंतर, महामंडळाने पुन्हा सी लिंकच्या बांधकामाचं काम सुरू करण्याची तयारी सुरू केली.
वांद्रे-वर्सोवा सी लिंकचं बांधकाम 2018 पासून सुरू आहे. तसेच, 2022 मध्ये या प्रोजेक्टला खऱ्या अर्थाने गती मिळाली. 2022 मध्ये, सी लिंकचे काम फक्त 2.5 टक्के पूर्ण झालं होतं. मात्र गेल्या अडीच वर्षांत, सी लिंकचं बांधकाम 35 टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झालं असल्याची माहिती आहे. कामाचा वेग वाढवण्यासोबतच आता सी लिंक पाण्याखाली येऊ लागला आहे.
हे ही वाचा: Govt Job: 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल 3000 हून अधिक पदांसाठी भरती अन्...
प्रोजेक्टच्या बांधकामासाठी विलंब का?
प्रोजेक्टच्या सुरुवातीला सी लिंकचं बांधकाम एका भारतीय कंपनीला देण्यात आलं होतं. या कंपनीला एका इटालियन कंपनीच्या सहकार्याने हा प्रोजेक्ट पूर्ण करायचा होता, परंतु कंपनी काम करण्यास असमर्थ ठरल्यामुळे, भारतीय कंपनीला प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आलं. दुसऱ्या कंपनीकडे काम सोपवल्यानंतर, आता काम वेगाने सुरू झाल्याची माहिती आहे. मात्र, विलंबामुळे या प्रकल्पाची अंतिम मुदत 2026 वरून 2028 पर्यंत वाढवण्यात आली आहे.










