Govt Job: 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल 3000 हून अधिक पदांसाठी भरती अन्...
रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून अंडर ग्रॅज्युएट एनटीपीसी (NTPC) भरतीचं शॉर्ट नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. संबंधित भरती ही 3000 हून अधिक पदांसाठी जाहीर करण्यात आली असून 12 वी उत्तीर्ण उमेदवार यामध्ये सहभागी होऊ शकतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी!
3000 हून अधिक पदांसाठी भरती अन्...
RRB NTPC 2025: रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून अंडर ग्रॅज्युएट एनटीपीसी (NTPC) भरतीचं शॉर्ट नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. संबंधित भरती ही 3000 हून अधिक पदांसाठी जाहीर करण्यात आली असून 12 वी उत्तीर्ण उमेदवार यामध्ये सहभागी होऊ शकतात.
रेल्वे भरती बोर्ड (RRB) च्या एनटीपीसी (NTPC) भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 28 ऑक्टोबर 2025 पासून अर्जाची प्रक्रिया सुरू होणार असून 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवार अर्ज करण्यासाठी www.rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाइटवर भेट जाऊन अर्ज करू शकतात.
काय आहे पात्रता?
रेल्वे एनटीपीसी (NTPC)च्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 50 टक्के गुणांसह 12 उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तसेच, एससी (SC), एसटी (ST) प्रवर्गातील आणि अपंग उमेदवारांना गुणांची अट लागू होणार नाही. याव्यतिरिक्त, उमेदवारांचं इंग्रजीमध्ये प्रति मिनिट 30 शब्द आणि हिंदीमध्ये प्रति मिनिट 25 शब्द टाइपिंग स्पीड असणं आवश्यक आहे.
हे ही वाचा: आधी अपहरण केलं अन् निर्दयीपणे मारहाण! नंतर, तरुणावर लघुशंका करत जातीवाचक कमेंट्स... अहिल्यानगरमधील घटना
वयोमर्यादा
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2026 ही तारीख लक्षात घेऊन उमेदवारांच्या वयाची गणना केली जाणार आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.










