भुसावळ : कॉपर फॅक्टरीत भीषण स्फोट, दोन कामगारांचा होरपळून मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात सुनसगाव रस्त्यावर असलेल्या एका फॅक्टरीत भीषण स्फोट होऊन दोन कामगार ठार झाले आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काशिनाथ सुरवाडे, खेमसिंग पटेल या दोन कामगारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अपघाताची माहिती मिळताच भुसावळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. सुनसगाव रस्त्यावर दिया […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:07 AM • 22 Jan 2022

follow google news

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात सुनसगाव रस्त्यावर असलेल्या एका फॅक्टरीत भीषण स्फोट होऊन दोन कामगार ठार झाले आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काशिनाथ सुरवाडे, खेमसिंग पटेल या दोन कामगारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अपघाताची माहिती मिळताच भुसावळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.

हे वाचलं का?

सुनसगाव रस्त्यावर दिया कॉपर मास्टर अलॉयज नावाची फॅक्टरी आहे. या फॅक्टरीत ही दुर्घटना घडली. शुक्रवारी दुपारी एका ऑईलच्या टाकीला दोन मजूर वेल्डींग करत होते. त्यावेळी अचानक स्पार्किंग होऊन मोठा स्फोट झाला. त्यात काशिनाथ व खेमसिंग दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. स्फोटाच्या आवाजाने परिसरात मोठा आवाज झाल्याने अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

या घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनीही घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्याचा आढावा घेतला.

    follow whatsapp