शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेविरोधात २२ FIR, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश

विद्या

• 02:52 PM • 22 Aug 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केतकी चितळेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली. केतकीला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा तिच्या विरोधात राज्यभरात २२ FIR दाखल करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात आता बॉम्बे हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काय म्हटलं आहे बॉम्बे हायकोर्टाने केतकी चितळेच्या २२ एफआयआरबाबत? केतकी चितळेच्या […]

Mumbaitak
follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केतकी चितळेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली. केतकीला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा तिच्या विरोधात राज्यभरात २२ FIR दाखल करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात आता बॉम्बे हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे बॉम्बे हायकोर्टाने केतकी चितळेच्या २२ एफआयआरबाबत?

केतकी चितळेच्या विरोधात राज्यभरात एकूण २२ FIR करण्यात आल्या आहेत. त्यातली पहिली एफआयआर ही कळवा पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्यानंतर राज्यातल्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये या एफआयआर दाखल झाल्या. या सगळ्या गुन्ह्यांसाठी केतकी चितळेला २२ पोलीस ठाण्यात नाही तर कळवा पोलीस ठाण्यातच जावं लागेल. कारण बॉम्बे हायकोर्टाने या सगळ्या एफआयआर कळवा पोलीस ठाण्यात वर्ग केल्या जाव्यात असा आदेश दिला आहे.

या प्रकरणी केतकी चितळेविरोधात २२ एफआयआर आहेत, तर निखील भामरेच्या विरोधात सहा एफआयआर आहेत. निखिली भामरेच्या विरोधातल्या सहा एफआयआर या देखील नौपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्या आहेत. निखील भामरेने त्याच्या विरोधातल्या आणि केतकी चितळेविरोधातल्या एफआआयआर रद्द करण्यात याव्या अशी याचिका हायकोर्टात केली होती.

शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह कविता शेअर केल्यानंतर केतकी चितळे २४ दिवसांहून जास्त काळ तुरुंगात होती. केतकी चितळेने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून शेअर केलेली पोस्ट अॅड नितीन भावे नावाच्या व्यक्तीची आहे. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत भाषेत लिहिलेलं असून, त्यावरून केतकी चितळे आता टीकेची धनी ठरली. तिच्यावर विविध पोलीस ठाण्यात २२ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या २२ एफआयआर आता एकाच पोलीस ठाण्यात वर्ग करण्याचा आदेश बॉम्बे हायकोर्टाने दिला आहे.

केतकी चितळेने जी पोस्ट शेअर केली ती अॅड. नितीन भावे या व्यक्तीची आहे. मे महिन्यात शरद पवार यांनी साताऱ्यात केलेल्या भाषणात कवी जवाहर राठोड यांची एक कविता वाचून दाखवली होती.

या कवितेतून कवीने देवी-देवतांवर टीकात्मक भाष्य केलेलं आहे. याच कवितेवरून सोशल मीडियावरून पवारांवर टीका केली जात होती. पवारांच्या भाषणाचा निवडक भाग शेअर करून ही टीका केली गेली. त्याच प्रकरणावरून केतकीने ही पोस्ट शेअर केली आहे.

    follow whatsapp