राणे, शिरसाट करणार संजय राऊतांची चौकशी; हक्कभंग समितीमध्ये ठाकरेंना झटका

ऋत्विक भालेकर

01 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 05:16 PM)

मुंबई : शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील हक्कभंग प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी हक्कभंग समिती गठीत करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही समिती गठीत केली आहे. दौंडचे भाजप आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय भाजप (BJP), शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील हक्कभंग प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी हक्कभंग समिती गठीत करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही समिती गठीत केली आहे. दौंडचे भाजप आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय भाजप (BJP), शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) या पक्षातील १४ आमदारांना या समितीमध्ये सदस्य म्हणून स्थान देण्यात आलं आहे. त्याचवेळी ठाकरे गटातून मात्र कोणत्याही आमदाराला स्थान देण्यात आलेलं नाही. (A disenfranchisement committee has been constituted to probe the disenfranchisement proposal against Shiv Sena (UBT) leader and MP Sanjay Raut.)

हे वाचलं का?

कोण कोण आहे या समितीमध्ये?

  • अध्यक्ष – राहुल कुल

सदस्य :

  • भाजप : अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नितेश राणे, अभिमन्यू पवार

  • शिवसेना : संजय शिरसाठ, सदा सरवणकर,

  • राष्ट्रवादी : दिलीप मोहिते पाटील, माणिकराव कोकाटे, सुनिल भूसारा,

  • काँग्रेस : नितीन राऊत, सुनिल केदार,

  • अपक्ष : विनय कोरे, आशिष जैस्वाल

‘संजय राऊतांनी भाजपसमोर गुडघे टेकले नाही, ते काय माफी मागतील’, कोण म्हणालं?

काय आहे प्रकरण?

संजय राऊत यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना विधिमंडळाबाबत केलेलं एक वक्तव्य चांगलचं वादग्रस्त ठरलं आहे. या वक्तव्यावरुन संपूर्ण राजकीय वातावरण तापलं आहे. त्यावरून वाद निर्माण झाला.

“सरकार बदलताच या चोरांना क्लिनचीट देण्यात आली. असे गेल्या सहा महिन्यात या सरकारने ईडब्ल्यूच्या माध्यमातून 28 चोरांना क्लिनचीट देण्याचा उपक्रम राबवला. जे विरोधात आहेत. त्यांना तुरुंगात टाकायचं. खोटे गुन्हे दाखल करायचे. बदनाम करायचं. लक्षात ठेवा. 2024 ला याचा हिशोब केला जाईल”, असं विधान संजय राऊतांनी केलं.

“ही जी बनावट सेना आहे, डुप्लिकेट. चोरांचं मंडळ… हे विधिमंडळ नाही, चोर मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावर काढलं तरी आम्ही काय पक्ष सोडणार आहोत का? अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने दिली. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिली आहेत. ती आम्ही पक्षासाठी ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीये. पदं गेली पदं परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा आहे”, असं विधान संजय राऊतांनी कोल्हापुरात केलं.

रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियन संघाचा रथ रोखला; असा झाला पहिल्या दिवशीचा खेळ

राहुल नार्वेकरांनीही केलं मान्य :

दरम्यान, राऊतांच्या वक्तव्यावरुन आज महाराष्ट्राच्या विधिमंडळात मोठा गोंधळ झाल्याच पाहायला मिळालं. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचं मत वाचून दाखवलं. तसंच, दोन दिवसांत यासंदर्भात चौकशी करुन पुढील निर्णय बुधवारी जाहीर करु असं राहुल नार्वेकर यांनी निवेदनातून सांगितलं. त्यासोबतच निर्णय वाचून दाखवताना सभागृहाचा अवमान झाल्याची टिप्पणीही त्यांनी केली.

    follow whatsapp