Thane Crime: CM एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसेनेच्या नेत्याची हत्या

मुंबई तक

01 Mar 2023 (अपडेटेड: 23 Mar 2023, 08:40 PM)

Thane Shiv Sena leader Murder Case: ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) ठाण्यात (Thane) शिवसेनेच्या (Shiv Sena) एका स्थानिक नेत्याची हत्या (murder) झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ठाण्यात नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 28 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास व्यवसायाच्या वादातून डोक्यात चॉपर मारून हत्या केल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील मयत […]

Mumbaitak
follow google news

Thane Shiv Sena leader Murder Case: ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) ठाण्यात (Thane) शिवसेनेच्या (Shiv Sena) एका स्थानिक नेत्याची हत्या (murder) झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ठाण्यात नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 28 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास व्यवसायाच्या वादातून डोक्यात चॉपर मारून हत्या केल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील मयत हा शिवसेनेचा उपविभाग प्रमुख पदावर होता. या घटनेत पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. (a local shiv sena leader was killed in thane due to a business dispute)

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

ठाण्यातील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जांभळी नाका, पेढा मारुती मंदिरासमोर 28 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास रवींद्र मच्छिन्द्र परदेशी (वय 49 वर्ष) यांच्यावर काही अज्ञात इसमांनी डोक्यात चॉपरच्या साहाय्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.

रवींद्र परदेशी हे शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख पदावर होते. त्यांना तात्काळ ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी रवींद्रला मृत घोषित केले. बारक्या उर्फ राजेंद्र परदेशी याचा लहान भाऊ रवींद्र परदेशी आहे. फेरीवाल्यांवर बारक्या याचे वर्चस्व होते. त्याच्या मृत्यूनंतर रवींद्र परदेशी हा देखील फेरीवाल्यांच्या वर्चस्वाच्या स्पर्धेत होता. त्यातच नुकतीच त्याची शिवसेना (शिंदे गट) मध्ये उपविभागप्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती. पण ही हत्या कुठल्याही राजकीय हेतूने झाली नसून व्यवसायाच्या वादातून झाल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. दरम्यान फेरीवाल्याच्या हप्ता वसुली आणि वर्चस्वाच्या स्पर्धेचा रवींद्र परदेशी हा बळी ठरला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Crime : नांदेड शहरात 22 वर्षीय तरुणाची हत्या; हे कारण येतंय समोर

ठाणे नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची नोंद करत तपासाला सुरुवात केली. या प्रकरणी पोलिसांनी ध्रुव विश्वनाथ पटवा (वय 33 वर्ष) आणि अश्रफ हजरत अली (वय 21 वर्ष) या दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. मयत आणि आरोपी ध्रुव पटवा या दोघांची ठाणे मार्केटमध्ये समोरासमोर दुकाने होती.

Avinash Manatkar: भाजप नेत्याच्या पतीची आत्महत्या, माजी आमदारावर गंभीर आरोप

दुकान लावण्याच्या वादातून ध्रुवने आपला साथीदार अश्रफ याच्यासोबत संगनमत करून ही हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या दोघांना तात्काळ अटक करून त्यांच्या विरोधात जीवघेणा हल्ला आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणे नगर पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक सचिन कदम करत आहेत.

    follow whatsapp