वाशिमच्या युवकाचा विश्वविक्रम, किलीमांजारो पर्वतावर रोवला भारताचा झेंडा

– ज़का खान, प्रतिनिधी महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातील तरुण यश इंगोलेने दक्षिण आफ्रिकेतल्या किलीमांजारो पर्वतावर भारताचा झेंडा रोवला आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या सर्वात उंच पर्वतावर १५ ऑगस्ट २०२१ रोजी चढून यश इंगोलेने केसरी चित्रपटातील तेरी मिट्टी मे मिल जांवा या गाण्यावर डान्स केला होता. त्याच्या या कामगिरीची दखल घेत, हाय रेंज बूक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याचं नाव समाविष्ट […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 01:14 PM • 09 Oct 2021

follow google news

– ज़का खान, प्रतिनिधी

हे वाचलं का?

महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातील तरुण यश इंगोलेने दक्षिण आफ्रिकेतल्या किलीमांजारो पर्वतावर भारताचा झेंडा रोवला आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या सर्वात उंच पर्वतावर १५ ऑगस्ट २०२१ रोजी चढून यश इंगोलेने केसरी चित्रपटातील तेरी मिट्टी मे मिल जांवा या गाण्यावर डान्स केला होता.

त्याच्या या कामगिरीची दखल घेत, हाय रेंज बूक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याचं नाव समाविष्ट करण्यात आलंय. किलीमांजारो पर्वतावर चढून डान्स करणारा जगातला पहिला व्यक्ती असा सन्मान यश इंगोलेच्या नावावर जमा झाला आहे. किलीमांजारो पर्वत चढाईसाठी अत्यंत कठीण मानला जातो. देशाच्या सीमांचं रक्षण करताना हौतात्म्य पत्करलेल्या जवानांसाठी हा रेकॉर्ड केल्याचं यशने सांगितलं.

किलीमांजारो पर्वताची उंची ही १९ हजार फुटांपेक्षा जास्त आहे. यशने ज्यावेळी या पर्वतावर चढायला सुरुवात केली, त्यावेळी तिकडचं तापमान हे – २५ डिग्री एवढं होतं. परंतू वाटेत आलेल्या सर्व अडथळ्यांवर मात करत यशने पर्वताच्या शिखरावर भारताचा तिरंगा फडकावला आहे. याआधी हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम, अण्णा हजारे, सोनू सूद, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यासारखअया भारतीयांचाही सन्मान करण्यात आला आहे.

    follow whatsapp