‘भाजप सत्तेत आलं नाही तर केंद्राच्या…’, अरविंद केजरीवालांचा गंभीर आरोप

मुंबई तक

25 May 2023 (अपडेटेड: 25 May 2023, 12:04 PM)

Arvind Kejriwal Criticize BJP : जर भाजप निवडून आली नाही, सत्तेवर बसली नाही, तर केंद्राच्या माध्यमातून विरोधी पक्षासोबत नेमका काय प्रकार घडतो, याचाच पाढाच केजरीवाल य़ांनी यावेळी वाचून दाखवला आहे.

aap cm arvind kejriwal meet sharad pawar on yb center criticize bjp

aap cm arvind kejriwal meet sharad pawar on yb center criticize bjp

follow google news

Arvind Kejriwal Criticize BJP : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांनी आज आपच्या नेत्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची वाय बी सेंटरमध्ये भेट घेतली. या भेटीत केजरीवाल यांची शरद पवार यांच्यासोबत अनेत तास बैठक पार पडली. या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहे. जर भाजप निवडून आली नाही, सत्तेवर बसली नाही, तर केंद्राच्या माध्यमातून विरोधी पक्षासोबत नेमका काय प्रकार घडतो, याचाच पाढाच केजरीवाल य़ांनी यावेळी वाचून दाखवला आहे. (arvind kejriwal meet sharad pawar on yb center criticize bjp)

हे वाचलं का?

तीन घटना काय?

जर भाजप सत्तेवर आली नाही, तर विरोधी पक्षासोबत तीन घटना घडतात,असे केजरीवाल यांनी सांगितले. पहिली घटना म्हणजे, आमदारांना विकत घेऊन भाजप सरकार स्थापते. किंवा ईडी,सीबीआयची धमकी देऊन आमदारांना तोडण्याचा प्रयत्न करुन करून स्वत:ची सरकार स्थापन करते. तसेच जर आमदार विकले गेले नाहीत आणि धमकीलाही घाबरले नाहीत, तर अध्यादेश काढून गर्व्हनरच्या सहाय्याने त्यांना काम करून दिले जात नाही,असा भाजपचा संपूर्ण कार्यक्रम असल्याचे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी सांगितले.

हे ही वाचा: CM केजरीवाल पुन्हा ‘मातोश्री’वर; ठाकरेंसमोर मोदींना म्हणाले अहंकारी, स्वार्थी माणूस…

जर भाजपला कोणी वोट दिलं नाही, भाजपचे सरकार सत्तेवर आणले नाही, तर सरकार आम्ही चालू देणार नाही आणि पाडणार अशी भूमिका भाजपची असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. देशासाठी ही धोकादायक परिस्थिती आहे, असे देखील केजरीवाल म्हणतात. तसेच काहीच महिन्यापुर्वी जनतेने निवडलेल्या सरकारला ईडी आणि सीबीआयद्वारे धमकावून पाडले गेले यांची आठवण देखील केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी करून दिली.

दरम्यान केंद्र सरकारने दिल्ली सरकारला अधिकार बहाल करणारा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून अध्यादेश काढून राज्यपालांना प्रशासनाचे अधिकार बहाल केले आहेत. या संदर्भातील बील हे भाजपा संसदेत मांडणार आहे. त्यामुळे हे बील संसदेत पास होऊ नये यासाठी अरविंद केजरीवाल भाजप विरोधी पक्षाची भेट घेत आहे. आज केजरीवाल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्या बील विरोधात मत देण्याचे आश्वासन दिल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. बुधवारी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

भाजप विरोधी सर्वत्र एकवटले तर बे बील मंजूर होणार नाही.त्यामुळेच केजरीवाल देशातील विरोधी पक्षाची भेट घेऊन त्यांना हे बिल संसदेत पास होऊ नये यासाठी आग्रही करून घेत असल्याचे बोलले जात आहे.

    follow whatsapp