Bharat Jodo Yatra : दोघांना ट्रकने उडवलं; एकाचा मृत्यू, एक जखमी

नांदेड : भारत जोडो यात्रेचा आज राज्यातील पाचवा दिवस आहे. या दरम्यान अर्धापुर-हिंगोली महामार्ग एक गंभीर अपघात झाल्याचं वृत्त समोर येत आहे. गुरुवारी रात्री उशीरा एका अनोळखी ट्रकने दोघांना उडवल्याची घटना घडला आहे. या घटनेत एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. तामिळनाडू राज्यातील गणेशन (वय ६२) असं मृत्यू झालेल्या कार्यकर्त्यांचं […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:03 AM • 11 Nov 2022

follow google news

नांदेड : भारत जोडो यात्रेचा आज राज्यातील पाचवा दिवस आहे. या दरम्यान अर्धापुर-हिंगोली महामार्ग एक गंभीर अपघात झाल्याचं वृत्त समोर येत आहे. गुरुवारी रात्री उशीरा एका अनोळखी ट्रकने दोघांना उडवल्याची घटना घडला आहे. या घटनेत एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे.

हे वाचलं का?

तामिळनाडू राज्यातील गणेशन (वय ६२) असं मृत्यू झालेल्या कार्यकर्त्यांचं नाव आहे. तर सययुल (वय ३०) असं जखमी कार्यकर्त्यांचं नाव आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेत जखमी कार्यकर्त्यांची विचारपूस केली.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते श्रीनगर अशी भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रेचा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील गुरुवार चौथा दिवस होता. नवीन मोंढा परिसरात राहुल गांधीची आयोजित जाहीर सभेनंतर सर्व कार्यकर्ते महादेव पिंपळगाव येथील कॅम्पकडे रवाना झाले.

दरम्यान, रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास महादेव पिंपळगाव परिसरात नांदेड-अकोला हायवेवर पायी चालणाऱ्या तामिळनाडू राज्यातील गणेशन आणि सययुल या दोघांना अनोळखी ट्रकने धडक दिली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु गणेशन यांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या जखमी कार्यकर्त्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिस अधिक तपास करित आहे.

अशोक चव्हाण तत्काळ रुग्णालयात :

या घटनेची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार मोहन हंबर्डे तात्काळ शासकीय रुग्णालयात पोहचले. रात्री साडेबारा वाजेपर्यंत चव्हाण रुग्णालयात होते. त्यांनी जखमी कार्यकर्त्याची विचारपूस केली, तसंच योग्य उपचारासाठी निर्देश दिले.

    follow whatsapp