आदित्य ठाकरेंचा भाजपला धक्का, कल्याण-डोंबिवलीतले चार माजी नगरसेवक शिवसेनेत

मुंबई तक

• 11:27 AM • 18 Feb 2022

मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, ठाणे महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण डोंबिवली महापालिकेचे भाजपचे चार माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक रवी मट्या पाटील हे शिवसेना पक्षात प्रवेश केले आहेत. गेल्या दोन महिन्यांत भाजपाच्या 6 विद्यमान आणि 2 माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. भाजपसह […]

Mumbaitak
follow google news

मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, ठाणे

हे वाचलं का?

महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण डोंबिवली महापालिकेचे भाजपचे चार माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक रवी मट्या पाटील हे शिवसेना पक्षात प्रवेश केले आहेत. गेल्या दोन महिन्यांत भाजपाच्या 6 विद्यमान आणि 2 माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. भाजपसह इतर पक्षांचे अजून 17 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या प्रवेशानंतर भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत फुटीरते मुळे सुरुंग लागला आहे.

कल्याण-डोंबिवली पालिकेतील डोंबिवलीतील तुकाराम नगर प्रभागाचे माजी भाजप नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेविका रंजना नितीन पाटील आणि आयरे गावचे काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी पाटील, भाजपाचे माजी नगरसेवक रणजित जोशी, माजी नगरसेविका वृषाली रणजित जोशी हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून शिवबंदन बांधले.

याच वर्षात होऊ घातलेल्या कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीत नवीन प्रभाग रचनेमध्ये भाजपच्या बहुतांशी प्रस्थापित नगरसेवकांचे प्रभागाची मोडतोड ते अन्य प्रभागांना जोडण्यात आले आहेत असे आरोप विरोधकांनी केलंय. त्यामुळे भाजप नगरसेवकांमध्ये, इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. येत्या पालिका निवडणुकीत आपणास उमेदवारी मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने भाजपमधील माजी नगरसेवक इच्छुकांनी शिवसेनेची वाट धरली आहे.

गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत डोंबिवलीत शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांची एकूण संख्या आता आठ झाली आहे. भाजपला गळती लागू नये त्यासाठी वरिष्ठांकडून बैठका घेत नसल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे. येणार काळात भाजपसह इतर पक्षांचे 17 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून कल्याण-डोंबिवलीमध्ये वीर सावरकरांच्या नावावरून मोठा वाद सुरू झाला आहे. कल्याण-डोंबिवलीमधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा प्रभाग नव्या प्रभाग रचनेमध्ये रद्द करण्यात आल्यानंतर त्यावरून भाजपानं रान उठवलं आहे. शिवसेनेनं हिंदुत्ववादी विचार संपवण्याचा घाट घातल्याचा आरोप भाजपाकडून आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला होता. त्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला जात असताना आता शिवसेनेनं भाजपाला शह देण्यासाठी नवी खेळी केली आहे. गेल्या 4 वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या सावरकर सभागृहाचं आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

    follow whatsapp