नगर जिल्हा रुग्णालयाला आगीचं प्रकरण : डॉ. विशाखा शिंदे यांच्यासह चारही आरोपींना जामीन मंजूर

मुंबई तक

• 12:38 PM • 19 Nov 2021

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीप्रकरणात आज कोर्टाने चारही आरोपींना जामीन मंजूर केला आहे. तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये चारही आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. विशाखा शिंदे यांच्यासह परिचारिका सपना पाठारे, अस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संघटनांनी परिचारिकांना या गुन्ह्यात अटक केल्याने या […]

Mumbaitak
follow google news

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीप्रकरणात आज कोर्टाने चारही आरोपींना जामीन मंजूर केला आहे. तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये चारही आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

डॉ. विशाखा शिंदे यांच्यासह परिचारिका सपना पाठारे, अस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संघटनांनी परिचारिकांना या गुन्ह्यात अटक केल्याने या अटकेच्या कारवाईचा निषेध नोंदवला होता. ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप डॉक्टर संघटना, परिचारिका संघटनांनी केला होता. सोबतच या प्रकरणातील प्रमुख सुत्रधाराला अटक करण्याची मागणी केली होती.

शनिवारी ६ नोव्हेंबर जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागाला आग लागली होती . या दुर्घटनेत बारा रुग्णांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी तीन जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये चार आरोपींना अटक आली होती. दरम्यान आज या चारही आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.

    follow whatsapp