“55 वर्षांत बारामतीला अनेक जण आले अन् गेले” : सीतारामन यांच्या दौऱ्यावर पवारांचे भाष्य

मुंबई तक

02 Sep 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:48 AM)

बारामती : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन सीतारामन यांच्या बहुचर्चित बारामती दौऱ्यावर सध्य राज्यभरात चर्चा सुरु आहेत. दरम्यान सीतारमन यांच्या याच दौऱ्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. “55 वर्षांत बारामतीला अनेक जण आले अन् गेले” : अजित पवार बारामतीत कोणीही येऊ द्या, त्यांचे आम्ही स्वागतच करु. गेली 55 वर्ष झालं आम्ही बघत आहोत, […]

Mumbaitak
follow google news

बारामती : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन सीतारामन यांच्या बहुचर्चित बारामती दौऱ्यावर सध्य राज्यभरात चर्चा सुरु आहेत. दरम्यान सीतारमन यांच्या याच दौऱ्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे.

हे वाचलं का?

“55 वर्षांत बारामतीला अनेक जण आले अन् गेले” : अजित पवार

बारामतीत कोणीही येऊ द्या, त्यांचे आम्ही स्वागतच करु. गेली 55 वर्ष झालं आम्ही बघत आहोत, अनेक जण येतात, भेटतात, जातात. पंतप्रधान बारामतीत आले, आम्ही त्यांचेही स्वागत केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, चंद्रशेखर बावनकुळे आले तरी त्यांचेही स्वागतच आहे. बारामतीत कोणीही यावे, बारामतीकरांना भेटावे. मात्र बारामतीकर त्यांना जे हवे आहे तेच करतात, असेही पवार म्हणाले.

काँग्रेसचे सात आमदार भाजपच्या संपर्कात? देवेंद्र फडणवीस-अशोक चव्हाणांची मुंबईत भेट

राजु शेट्टींवरही पवारांचा निशाणा :

काही दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर आरोप केले होते. काहींना केवळ टेंडर काढण्यातच रस असतो. शेतकरी हिताचे निर्णय घेत नाहीत, असा आरोप शेट्टी यांनी केला होता. यावर अजित पवार यांनी उत्तर दिले.

सध्या बारामतीत जी विकास कामे चालू आहेत, ते टेंडर काढण्यात रस आहे, म्हणून चालली आहेत काय? असा सवाल पवार यांनी विचारला. तसेच बाहेरच्या व्यक्तीने येऊन उचलली जीभ लावली टाळ्याला, हा जरी त्यांचा अधिकार असला तरी त्याला किती महत्त्व द्यायचं हा बारामतीकरांचा अधिकार आहे. मी ज्या दिवसापासून बारामतीचे प्रतिनिधित्व स्वीकारले आहे. तेव्हापासून आजपर्यंत कोणत्याही कामाच्या टेंडरमध्ये पाच पैशाचाही मिंदा नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघाची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्याकडे

दरम्यान गेल्या सहा महिन्यांपासून भाजपने राज्यातील 16 लोकसभा मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. या मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्र्यांना प्रभारी म्हणून लक्ष घालण्यास सांगितले आहे. या 16 मतदारसंघांमध्ये बारामती मतदारसंघाचाही समावेश असून याची जबाबदारी सीतारमन यांना दिली आहे. सीतारमन यांच्या बारामती दौऱ्यावर काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली होती.

आम्ही कुणी नाही, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरीच आमच्या संपर्कात-अब्दुल सत्तार

फडणवीस म्हणाले होते, “गेल्या दोन्ही निवडणुकांत बारामतीमध्ये आम्हाला चांगली मतं मिळाली आहेत. आम्ही चांगली लढत त्या मतदारसंघात दिली आहे. त्यामुळे तो मतदारसंघ १६ मतदारसंघात आहे. १६ मतदारसंघासाठी केंद्रीय नेतृत्वाने केंद्रीय नेत्यांकडे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. निर्मला सीतारामन यांना बारामती मतदारसंघ दिला आहे. त्या साधारणपणे सप्टेंबरमध्ये येतील”

    follow whatsapp