थरारक पाठलाग अन् लव्ह जिहाद प्रकरणातील युवती ताब्यात, राणा- बोडेंनी लक्ष घातलेलं प्रकरण नेमकं काय?

सातारा: अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील एका महाविद्यालयीन युवतीला फूस लावून पळवून नेवून तसेच तिचे ब्रेन वॉश करुन तिच्याशी आंतरधर्मीय विवाह केल्याचे समोर आले होते. त्यामुळे अमरावतीसह राज्यभरातील वातावरण स्फोटक बनले होते. याच धर्तीवर आज रात्री उशिरा संबंधित मुलगी सातारा येथील रेल्वे स्थानकात सापडली असून रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अमरावती […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 04:53 AM • 08 Sep 2022

follow google news

सातारा: अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील एका महाविद्यालयीन युवतीला फूस लावून पळवून नेवून तसेच तिचे ब्रेन वॉश करुन तिच्याशी आंतरधर्मीय विवाह केल्याचे समोर आले होते. त्यामुळे अमरावतीसह राज्यभरातील वातावरण स्फोटक बनले होते. याच धर्तीवर आज रात्री उशिरा संबंधित मुलगी सातारा येथील रेल्वे स्थानकात सापडली असून रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

हे वाचलं का?

याबाबत अधिक माहिती अशी, अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील एका युवतीचे अपहरण करुन तिच्याशी आंतरधर्मीय विवाह केल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले होते. विवाहानंतर संबंधित मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी केला होता. तसेच पोलिसांनी पीडित मुलीला पोलीस ठाण्यात आणावे, अशी मागणी केली होती.

संबंधित प्रकरणावरुन नवनीत राणांची पोलिसांशी हुज्जत

संबंधित प्रकरण लव्ह जिहादचे असल्यामुळे या प्रकरणात स्थानिक खासदार नवनीत राणा तसेच राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी उडी घेतल्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले होते. काल दुपारी खासदार राणा यांनी पोलीस ठाण्यात जावून पोलिसांशी हुज्जत घातली होती. बनावट कागदपत्रांच्या आधारे लग्न लावून दिल्याचा आरोपही राणा यांनी केला होता. दरम्यान, हे प्रकरण ताजे असतानाच बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रात्री उशिरा सातारा येथील रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी पीडित युवतीस ताब्यात घेतले आहे.

सातारा पोलिसांनी सहा तास पाठलाग करुन युवतीला घेतलं ताब्यात

संबंधित युवतीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी सहा तासांचा पाठलाग केल्याचे समोर आले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला नव्हता. तसेच यासंदर्भात माहिती देण्याचेही पोलिसांनी टाळल्याने याबाबतची सखोल माहिती अद्याप हाती आलेली नाही. परंतू गेल्या काही दिवसांपासून अमरावतीसह राज्यभरात चर्चिले गेलेल्या लव्ह जिहादचा गौप्यस्फोट सातार्‍यात झाल्याने संबंधित युवती तसेच संशयिताची विचारपूस केल्यानंतर याबाबतची अधिक माहिती मिळणार आहे.

नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये हुज्जत

लव्ह जिहादच्या एका प्रकरणात पोलिसांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या खासदार नवनीत राणांनी बुधवारी पोलीस ठाण्यात आक्रमक शैलीत प्रचंड वाद घातला. मात्र, नवनीत राणा यांनी प्रचंड आरडाओरडा केल्यामुळे या पोलीस ठाण्यातील अधिकारीही चांगलेच आक्रमक होताना दिसले. अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात प्रकार घडला. यावेळी नवनीत राणा यांनी पोलिसांकडून याप्रकरणाच्या तपासात चालढकल होत असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी पीडित मुलीला पोलीस स्टेशनमध्ये आणावं. पोलीस या प्रकरणी तपासाला एवढा उशीर का करत आहेत, असा प्रश्न नवनीत राणा यांनी विचारला काल विचारला होता.

    follow whatsapp