Today Shocking Viral News : रक्ताचं नातं खूप पवित्र असतं. कुटुंबियांसोबत राहताना पवित्र नात्याचा आदर ठेवणे, हे तितकंच महत्त्वाचं असतं. पण हरियाणात आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. एका नराधम मुलाने सावत्र आईसोबत प्रेमसंबंध करून कोर्टात लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संतापजनक घटनेमुळं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
त्या गावात नेमकं घडलं तरी काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हे धक्कादायक प्रकरण हरियाणातील नूंह येथील आहे. येथील बासदल्ला गावात राहणाऱ्या रामकिशन पुत्र कन्हैयाचं लग्न 18 वर्षांपूर्वी फिरोजाबादमध्ये घडलं होतं. पहिल्या पत्नीला एक मुलगा झाला होता. पण काही वर्षांपूर्वी त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. तीन वर्षानंतर रामकिशनने सोहनसोबत दुसरं लग्न केलं. सोहना आणि रामकिशनच्या लग्नाला जवळपास 15 वर्षे झाली. सोहना आणि रामकिशनला एक मुलगी झाली.
हे ही वाचा >> 'आम्ही मिटवून टाकली भांडणं, आलो ना दोघं भाऊ एकत्र...' उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, पण...
त्यानंतर झाली मुलाची एन्ट्री..
रामकिशनच्या पहिल्या पत्नीचा मुलगा मोठा झाल्यावर वडिलांचा शोध घेता घेता पुन्हाना येथे पोहोचला. याचदरम्यान, तो तीन महिन्यापर्यंत त्याचे वडील आणि सावत्र आईसोबत राहत होता. याचदरम्यान अल्पवयीन मुलगा आणि सावत्र आईचे प्रेमसंबंध सुरु झाले. त्यानंतर त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि रातोरात घरातून पळाले. पण रामकिशनला या गोष्टीबाबत काहीही कळलं नाही. दोघंही घरातून सोनं आणि सामान घेऊन फरार झाले आणि कोर्टात लग्न केलं.
हे ही वाचा >> भाऊ गेला की वहिनीच्या खोलीत जायचा दीर अन्... एक दिवस पतीला खरं समजलं, पण...
मुलाचे वडिल पत्नी आणि मुलाचा शोध घेण्यासाठी तीन महिन्यांपासून पोलीस स्टेशनला फेऱ्या मारत आहेत. पण कोणताही तपास सुरु नाहीय. त्यानंतर पीडित व्यक्तीने सीएम विंडो मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दोघांविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली. पीडिताचं म्हणणं आहे की, त्यांचा मुलगा आईच्या पाया पडायचा. पण दोघांमध्ये प्रेमसंबंध कधी सुरु झाले, कळलंच नाही.
ADVERTISEMENT
