मुंबई: मुंबईत एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे आझाद मैदानावर मात्र गिरणी कामगारांचं आंदोलन सुरू आहे. याच आंदोलकांना संबोधित करण्यासाठी स्वत: शिवसेना UBT चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आझाद मैदानावर पोहचले. यावेळी उद्धव ठाकरे भाषण करताना पुन्हा एकदा मनसेसोबतच्या युतीबाबत मोठं विधान केलं आहे.
ADVERTISEMENT
एकीकडे राज ठाकरे यांनी अद्याप तरी युतीबाबत कोणतंही स्पष्ट विधान केलेलं नाही. एवढंच नव्हे तर आपल्या पदाधिकारी आणि प्रवक्त्यांना मीडियाशी बोलायचं नाही असा आदेश दिला आहे. असं असताना उद्धव ठाकरे हे मात्र वारंवार आणि उघडपणे म्हणत आहेत की, 'आम्ही एकत्र आलोय..'
हे ही वाचा>> MNS-Shivsena UBT: 'मीडियाशी अजिबात बोलायचं नाही..', थेट आदेश, राज ठाकरेंच्या मनात चाललंय तरी काय?
अशावेळी आता उद्धव ठाकरे हे युतीसाठी तयार आहेत. पण अद्यापही राज ठाकरेंनी थेट कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.
पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
मुंबईत आज दिल्लीच्या मालकाचे नोकर हे सत्तेत बसले आहेत. ते मुंबईतील गिरणी कामगार आणि मराठी माणूस हा मुंबईबाहेर काढायला आसूसलेला आहे. जग जिंकली तरी मुंबई पाहिजे.. का.. हे सत्ताधारी.. हे जे दोन व्यापारी तिकडे बसले आहेत त्यांच्यासाठी मुंबई म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. ती कोंबडी कापायला ते निघाले आहेत.
एकदा का मुंबईचा गळा घोटला की सगळं काही झालं. म्हणूनच मराठी माणसामध्ये आग लावायची. मराठी-अमराठी भेद करायचा. हा यांचा डाव.
हे ही वाचा>> 'मराठीचा माज नाही, गद्दारीची लाज नाही', वैभव जोशींच्या कवितेचं विडंबन... ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंना डिवचलं!
झालं ना गेल्या शनिवारी.. तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जे होतं.. आम्ही दोघं भाऊ आलो ना एकत्र.. कशासाठी आलो? आम्ही पण आमच्या राजकीय पोळ्या भाजत बसलो असतो. पण नाही.. आम्ही दोघेही प्रबोधनकारांचे नातू.. मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आणि राज माझ्या काकांचा.. श्रीकांत ठाकरेंचा पुत्र.
त्यावेळेला हे तिघे म्हणजे दोघे भाऊ आणि माझे आजोबा ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होते. आणि आता आमच्या डोळ्यादेखल संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबई तोडली जात असेल, चिरडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही काय नतद्रष्टासारखे भांडत बसू? आम्ही मिटवून टाकली भांडणं.. आणि आता उभे राहिलोत जो-जो महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे अजिबात धीर सोडू नका, हिंमत हरू नका. असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
