Andheri Bypoll : भाजपने माघार घेऊनही ऋतुजा लटकेंना निवडणूक लढवावी लागणार, ‘हे’ उमेदवार रिंगणात

मुंबई तक

17 Oct 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:42 AM)

अंधेरीची पोटनिवडणूक हा मुंबईत गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय होता. याच निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. ज्यामध्ये भाजपने माघार घेतली आहे. भाजपने या निवडणुकीसाठी भरपूर तयारी केली होती. मात्र त्यांनी निवडणुकीत माघार घेतली आहे. असं असलं तरीही ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. कारण निवडणुकीसाठी अर्ज मागे घ्यायची वेळ संपली आहे. तसंच अजूनही […]

Mumbaitak
follow google news

अंधेरीची पोटनिवडणूक हा मुंबईत गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय होता. याच निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. ज्यामध्ये भाजपने माघार घेतली आहे. भाजपने या निवडणुकीसाठी भरपूर तयारी केली होती. मात्र त्यांनी निवडणुकीत माघार घेतली आहे. असं असलं तरीही ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. कारण निवडणुकीसाठी अर्ज मागे घ्यायची वेळ संपली आहे. तसंच अजूनही सात उमेदवार रिंगणात आहेत.

हे वाचलं का?

कोणते उमेदवार आता रिंगणात आहेत?

१) ऋतुजा लटके, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

२) बाळा नाडार-आपकी अपनी पार्टी (पिपल्स)

३) मनोज कुमार नायक-राईट टू रिकॉल पार्टी

४) निना खेडेकर-अपक्ष

५) फरहान सय्यद-अपक्ष

६) मिलिंद कांबळे-अपक्ष

७) राजेश त्रिपाठी-अपक्ष

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके तर त्यांच्या विरोधात पक्षाचे दोन आणि अपक्ष चार असे सहा उमेदवार रिंगणात आहे. त्यांना या सगळ्यांचा सामना करावा लागणार आहे.

रमेश लटकेंच्या निधनामुळे होते आहे पोटनिवडणूक

रमेश लटकेंच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. ही निवडणूक लढवण्याची भूमिका भाजपनं सुरुवातीला घेतली होती. भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र, राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर निवडणुकीला वेगळं वळणं मिळालं होतं. आता भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. असं असलं तरीही निवडणूक बिनविरोध होणार नाही. सहा उमेदवारांच्या विरोधात ऋतुजा लटकेंना निवडणूक लढवावीच लागणार आहे.

निवडणूक लढवण्याची आशिष शेलारांची होती भूमिका?

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आधीच उमेदवार जाहीर केला होता. त्यामुळे विरोधात शिंदे गट उमेदवारी देणार की भाजप अशी उत्सुकता होती. मात्र, आशिष शेलार यांनी लगेच मुरजी पटेलांच्या नावाची घोषणा केली होती.

मुरजी पटेलांच्या नावाची घोषणा पक्षाकडून अधिकृतपणे अखेरच्या दिवशी करण्यात आली. मात्र त्यापूर्वीच मुरजी पटेल हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात होते. मात्र, त्यांना थांबवलं गेलं होतं. पटेल हे शेलारांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यामुळेच आशिष शेलार ही निवडणूक लढवण्याच्या भूमिकेत असल्याचं म्हटलं जात होतं.

    follow whatsapp