इतकी संपत्ती कशी जमवली हे अनिल देशमुख अजुनही सांगू शकले नाहीत – ईडीची कोर्टात माहिती

विद्या

• 02:06 PM • 07 Apr 2022

१०० कोटींच्या वसुली प्रकरणात जामिन मिळाला यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज ईडीने आपली बाजू कोर्टासमोर मांडली. अनिल देशमुख हे या प्रकरणातले मुख्य सूत्रधार असून त्यांनी अजुनही आपण इतकी संपत्ती कशी जमा केली हे सांगितलेलं नसल्याचं ईडीने कोर्टाला सांगितलं. ईडीकडून Assistant Director तहसीन सुलतान यांनी आपल्या संस्थेची बाजू मांडली. “देशमुख यांनी […]

Mumbaitak
follow google news

१०० कोटींच्या वसुली प्रकरणात जामिन मिळाला यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज ईडीने आपली बाजू कोर्टासमोर मांडली. अनिल देशमुख हे या प्रकरणातले मुख्य सूत्रधार असून त्यांनी अजुनही आपण इतकी संपत्ती कशी जमा केली हे सांगितलेलं नसल्याचं ईडीने कोर्टाला सांगितलं. ईडीकडून Assistant Director तहसीन सुलतान यांनी आपल्या संस्थेची बाजू मांडली.

हे वाचलं का?

“देशमुख यांनी आपल्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केली आहे, ती कशी जमा केली याचा स्त्रोत ते अजुनही सांगू शकले नाहीयेत. अनिल देशमुख हे राज्यातले मोठे राजकीय नेते असून त्यांचे मोठ्या व्यक्तींशी राजकीय संबंध आहेत. त्यामुळे जामिन मिळाला तर ते साक्षीदारांववर दबाव आणू शकतात”, असं ईडीने कोर्टासमोर सांगितलं. तसेच त्यांना जामिन मिळाला तर या तपासातील पुराव्यांशी ते छेडछाड करु शकतात असंही ईडीने कोर्टाला सांगितलं आहे.

ST संपाचा तिढा सुटला ! कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावं – हायकोर्टाचे आदेश

तसेच या प्रकरणात अनेक संशयितांचा जबाब नोंदवणं बाकी आहे जे अजुनही तपासाला सामोरं जाणं टाळत आहेत. त्यामुळे या घडीला अनिल देशमुखांना जामिन दिल्यास तपासावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो असं ईडीने सांगितलं. विशेष PMLA कोर्टाने देशमुख यांचा जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी याविरुद्ध हायकोर्टात धाव घेतली आहे.

देशमुख-मलिकांवर कारवाई झाली पवार दिल्लीत गेले नाहीत,राऊतांवर एवढं प्रेम का?- चंद्रकांत पाटील

कोर्टासमोर आपली बाजू मांडत असताना ईडीने आतापर्यंत झालेल्या तपासादरम्यान अनिल देशमुख हे या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचं सांगितलं. मुंबईतील बार मालकांकडून पैसे गोळा करणे, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पैसे स्विकारणे यासारख्या प्रकरणात देशमुख यांनीच आदेश दिल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत ईडीने ज्यांचा जबाब नोंदवला आहे त्या एकाही साक्षीदाराने आपला जबाब फिरावला नाही, याचाच अर्थ आम्ही कोणतीही जोर-जबरदस्ती न करता हा जबाब मिळवल्याचं ईडीने कोर्टाला सांगितलं.

वारंवार संधी देऊनही अनिल देशमुख आपल्या संपत्तीचा स्त्रोत सांगण्यात अयशस्वी ठरले या मुद्द्यावर ईडीने जोर दिल्यानंतर हायकोर्टाने या प्रकरणातली पुढील सुनावणी शुक्रवारी ठेवली आहे.

..तर त्या कर्मचाऱ्यांना नोकरीची गरज नाही असं आम्ही समजू- अनिल परबांचा ST कर्मचाऱ्यांना इशारा

    follow whatsapp