सचिन वाझे भाजपला खटकतात, अनिल परब यांनी सांगितलं कारण

मुंबई तक

• 12:35 PM • 09 Mar 2021

सचिन वाझे भाजपला खटकतात कारण त्यांनी अर्णब गोस्वामीवर कारवाई केली होती. त्यामुळे सचिन वाझेंवर भाजपचा राग आहे. विधानसभेच्या अधिवेशनात ते सचिन वाझेंवरचा राग काढत आहेत असं वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. ‘फडणवीस अडचणीत येतील म्हणून ते सचिन वाझेला टार्गेट करतायेत’ मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचं प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं […]

Mumbai Tak
Google CTA

सचिन वाझे भाजपला खटकतात कारण त्यांनी अर्णब गोस्वामीवर कारवाई केली होती. त्यामुळे सचिन वाझेंवर भाजपचा राग आहे. विधानसभेच्या अधिवेशनात ते सचिन वाझेंवरचा राग काढत आहेत असं वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

‘फडणवीस अडचणीत येतील म्हणून ते सचिन वाझेला टार्गेट करतायेत’

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचं प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं प्रकरण या दोन्हीचा तपास सुरू आहे. या चौकशीमध्ये जे कुणी दोषी असतील त्यांना महाविकास आघाडी सरकार माफ करणार नाही. सचिन वाझे हे जरी दोषी आढळले तर त्यांना पाठिशी घालणार नाही. सचिन वाझे हे पुरावे नष्ट करू शकतात हा विरोधी पक्षाचा दावा हास्यास्पद आहे असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जे काही पुरावे आहेत ते त्यांनी एटीएसकडे, पोलिसांकडे द्यावेत त्यामुळे तपास सोपा होईल, दोषींना शिक्षा होईल असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे. मात्र ते कोणतेही पुरावे द्यायला तयार नाहीत असंही परब यांनी स्पष्ट केलं.

आज विधानसभेत काय झालं?

आज विधानसभेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं प्रकरणावर भाष्य केलं. मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या जबाबाचा काही भागच त्यांनी विधानसभेत वाचून दाखवला. मनसुख हिरेन प्रकरणात मनसुख हिरेन यांच्या पत्नीने मनसुख यांचा खून झाल्याचं म्हटलं आहे. तसंच या सगळ्या प्रकरणात सचिन वाझे यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. त्यांचा जबाब समोर असूनही सरकार सचिन वाझेंवर कारवाई का करत नाही? त्यांना निलंबित का करत नाही? हे आणि असे प्रश्न विचारले. त्यानंतर अनिल परब यांनी उत्तर देत असताना मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचं प्रकरणही उपस्थित केलं. या सगळ्या गोष्टी घडत असताना विधानसभेत प्रचंड गदारोळ पाहण्यास मिळाला. तसंच पाचवेळा विधानसभेचं कामकाज तहकूब झालं आणि त्यानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब झालं.

Sachin Vaze नी माझ्या पतीची हत्या केल्याचा संशय-विमला हिरेन