दसऱ्याला एकनाथ शिंदेंचा ‘दुसरा’ मेळावा?, सदा सरवणकरांचा शिवाजी पार्कसाठी अर्ज

मुंबई: मागच्या अनेक दिवसांपासून शिवाजी पार्कवरती होणाऱ्या दसरा मेळाव्याची चर्चा होती. दसऱ्याच्या दिवशी नक्की शिवसेनेचा मेळावा होणार की एकनाथ शिंदे गटाचा याबाबत चर्चा होती. आता याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवाजी पार्कवरती दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाच्यावतीनं मुंबई महापालिकेकडं अर्ज करण्यात आला आहे. शिंदे गटातील आमदार सदा सरवरणकर यांनी हा अर्ज दाखल केला आहे. […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:11 PM • 02 Sep 2022

follow google news

मुंबई: मागच्या अनेक दिवसांपासून शिवाजी पार्कवरती होणाऱ्या दसरा मेळाव्याची चर्चा होती. दसऱ्याच्या दिवशी नक्की शिवसेनेचा मेळावा होणार की एकनाथ शिंदे गटाचा याबाबत चर्चा होती. आता याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवाजी पार्कवरती दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाच्यावतीनं मुंबई महापालिकेकडं अर्ज करण्यात आला आहे. शिंदे गटातील आमदार सदा सरवरणकर यांनी हा अर्ज दाखल केला आहे. या अगोदर शिवसेनेकडून देखील अर्ज करण्यात आला होता त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

हे वाचलं का?

सदा सरवरणकर अर्ज केल्यानंतर काय म्हणाले?

‘मुंबई तक’शी बोलताना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर म्हणाले ”गेल्या १५ वर्षांपासून दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी म्हणून मी अर्ज करत असतो. तशाच पद्धतीनं मी अर्ज केला आहे. दसरा मेळाव्याला जर परवानगी मिळाली तर त्याला प्रमुख मार्गदर्शन एकनाथ शिंदे करतील. आम्ही शिवसेना म्हणून अर्ज केला आहे त्यामुळे इतर कोणी अर्ज केला आहे याबाबत मला माहित नाही.” दसरा मेळाव्यातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार लोकांपर्यंत जावे ही आमची इच्छा असल्याचंही सदा सरवणकर म्हणाले आहेत.

शिवसेना आमदार मनिषा कायंदे याबाबत काय म्हणाल्या?

शिवसेना आमदार मनिषा कायंदे म्हणाल्या “एकनाथ शिंदे गटाचा मुद्दामून डिवचण्याचा प्रकार सुरु आहे. काल प्रताप सरनाईक यांची जी मुलाखत झाली त्यामध्ये दिसून आलं आहे की ते ईडीच्या भितीनंच गेले आहेत. हिंदुत्व वगैरे काही नाही त्यांचा हिंदुत्वाचा मुखवटा कधीच गळून पडलेला आहे. हा सर्व पोरकटपणा सुरु आहे, हे कोणाच्या दबावाखाली सुरु आहे हे दिसून येतंय. दिल्लीश्वरांकडून यांना सुचना येत आहेत आणि ते त्याचं पालन करत आहेत. उद्धव ठाकरेंना त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे.”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही करणार मेळाव्यासाठी अर्ज?

सध्या राज्यात गणेश उत्सव हा आनंद आणि उत्साह तसंच नवचैतन्य घेऊन आला आहे. अशात गणपतीच्या निमित्ताने राजकीय गाठीभेटीही घेतल्या जात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी दिग्गज भाजप नेते येऊन गेले. गुरूवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंच्या घरी आलेल्या गणपतीचं दर्शन घेतलं. याच गणेश उत्सवात चर्चा सुरू झाली आहे ती दसरा मेळाव्याची. तसंच मनसैनिकांची भावना समोर आल्याने आता राज ठाकरे उद्धव ठाकरेंकडून दसरा मेळावा हायजॅक करणार का या चर्चा सुरू झाल्या आहेत.

शिवसेनेचा दसरा मेळावा राज ठाकरे हायजॅक करणार? महाराष्ट्र सैनिकाच्या पत्रामुळे चर्चा

    follow whatsapp