ओवेसींवर सप्टेंबरमध्येच हल्ला करण्याचा होता कट; आरोपींचा धक्कादायक खुलासा

मुंबई तक

• 10:40 AM • 05 Feb 2022

एआयएमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष खासदार असदुद्दीने ओवेसींवर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. महामार्गावरील टोल नाक्यावर हल्ला झाल्यानं सगळीकडे हा मुद्दा गाजत असून, आता आरोपींनी पोलीस चौकशी दरम्यान धक्कादायक खुलासा केला आहे. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन अर्थात एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर ३ फेब्रवारी रोजी हल्ला करण्यात आला. दोन आरोपींनी […]

Mumbai Tak
Google CTA

एआयएमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष खासदार असदुद्दीने ओवेसींवर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. महामार्गावरील टोल नाक्यावर हल्ला झाल्यानं सगळीकडे हा मुद्दा गाजत असून, आता आरोपींनी पोलीस चौकशी दरम्यान धक्कादायक खुलासा केला आहे.

हे वाचलं का?

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन अर्थात एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर ३ फेब्रवारी रोजी हल्ला करण्यात आला. दोन आरोपींनी ओवेसींच्या गाडीवर गोळीबार केल्यानं खळबळ उडाली होती. हापुडमधाली छिझारसी टोल नाक्यावर ही घटना घडली होती.

असदुद्दीन ओवेसींवर हल्ला करणाऱ्या दोघांना उटक करण्यात आली आहे. सचिन शर्मा असं मुख्य आरोपीचं नाव असून, शुभम नावाच्या त्याच्या सहकाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. दोघांनाही तुरुंगात पाठवण्यात आलं असून, पोलीस चौकशी दरम्यान, त्यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.

गुरूवारी (३ फेब्रवारी) हापुडमधील छिझारसी टोल नाक्यावर दोन्ही आरोपींनी असदुद्दीन ओवेसींवर गोळीबार केला होता. दोन्ही आरोपींकडे सापडलेल्या बंदूका किठोर ठाणे क्षेत्रातील राधना गावातून खरेदी करण्यात आल्याचंही समोर आलं आहे.

मुख्य आरोपी सचिन शर्माजवळ ९ एमएमची बंदूक होती. आतापर्यंत करण्यात आलेल्या चौकशीतून हल्ल्याचा कटात दुसरं कुणी सहभागी नसल्याचं समोर आलं आहे. मुख्य आरोपी सचिन शर्माने हा कट रचला आणि मित्र शुभमला सोबत घेतलं होतं.

दरम्यान, पोलिसांच्या चौकशीतून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. असदुद्दीन ओवेसींवर सप्टेंबर महिन्यातच हल्ला करण्याचा कट होता. मात्र, तशी संधी मिळाली नाही. सप्टेंबरमध्ये संबळमध्ये हल्ला करण्यात आला असता आणि तो यापेक्षा जास्त घातक असता, अशी आरोपींनी चौकशीदरम्यान सांगितलं आहे.

मुख्य आरोपी सचिन शर्माने तीन ते चार वेळा ओवेसींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक वेळा तो ओवेसींच्या रॅलीला गेला. त्यांच्याजवळ पोहोचला मात्र, संधी मिळाली नाही. सप्टेंबरमध्ये संबळमध्ये ओवेसींची एक रॅली झाली होती. त्यावेळी सचिन शर्मा ओवेसींजवळ पोहोचला होता. मात्र, बंदूक काढण्याच्या आधीच ओवेसींभोवती लोकांचा गराडा पडला. सेल्फीसाठी जमा झालेल्या गर्दीने त्याला धक्का देऊन बाजूला केलं होतं.