धक्कादायक! शिलनाथ यात्रेत ५० भाविकांवर मधमाशांचा हल्ला, धावपळीत एकाचा दरीत कोसळून मृत्यू

सातारा तालुक्यातील शिवाजीनगर येथे डोंगरावर शिलनाथाची यात्रा आज पासुन सुरु झाली आहे. या ठिकाणी देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला. यामध्ये मधमाशा सुमारे ५० भाविकांना चावल्या असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी गडावर शेकडो भाविक उपस्थित होते.मधमाशांनी केलेल्या या हल्ल्यात सोमेश्वर विलास कदम या तारळे येथील १३ वर्षाचा मुलाचा डोंगराच्या कड्यावरून खाली कोसळून जागीच मृत्यू […]

Mumbai Tak

मुंबई तक

24 Apr 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:09 AM)

follow google news

सातारा तालुक्यातील शिवाजीनगर येथे डोंगरावर शिलनाथाची यात्रा आज पासुन सुरु झाली आहे. या ठिकाणी देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला. यामध्ये मधमाशा सुमारे ५० भाविकांना चावल्या असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी गडावर शेकडो भाविक उपस्थित होते.मधमाशांनी केलेल्या या हल्ल्यात सोमेश्वर विलास कदम या तारळे येथील १३ वर्षाचा मुलाचा डोंगराच्या कड्यावरून खाली कोसळून जागीच मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

ग्रामस्थ आणि आ.शिवेंद्रराजे भोसले ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन दरीत पडलेल्या मुलाला बाहेर काढलं. मात्र त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची प्रथमिक माहिती ग्रामस्थांनी दिली मात्र मृत्यू पावलेला १३ वर्षांचा सोमेश्वर त्याच्या मामाच्या शेरेवाडी या गावाला सुट्टीसाठी आला होता. सकाळच्या सुमारास डोंगरावर फिरण्यासाठी गेल्याच्या नंतर डोंगराच्या कपारीत बसलेल्या मधमाशांनी अचानक हल्ला केला यावेळी धावपळीत सोमेश्वर याचा पाय घसरला.

या नंतर तो थेट दरीत पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जाते आहे. मात्र अनेक लोकांना मधमाशांनी चावा घेल्यामुळे यात सुमारे ५० लोकं जखमी झाले आहेत गेल्या चार वर्षा पुर्वी यात्रे दरम्यानच मधमाशांनी चावा घेण्याची घटना घडली होती मात्र यात कोणाचही मृत्यू झाला नव्हता.

    follow whatsapp