शहीद संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर आधारित ‘मेजर’ सिनेमाबाबत मोठी घोषणा!

मुंबई तक

• 10:41 AM • 05 Apr 2021

26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित सिनेमा तयार येतोय. मेजर असं या सिनेमाचं नाव असून या सिनेमाबाबत मेकर्सने एक मोठा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. त्याचसोबत आता निर्मात्यांनी हा चित्रपट मल्याळम भाषेत प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच मल्याळम भाषेतील चित्रपटाचे पोस्टरदेखील प्रसिद्ध […]

Mumbaitak
follow google news

26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित सिनेमा तयार येतोय. मेजर असं या सिनेमाचं नाव असून या सिनेमाबाबत मेकर्सने एक मोठा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. त्याचसोबत आता निर्मात्यांनी हा चित्रपट मल्याळम भाषेत प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच मल्याळम भाषेतील चित्रपटाचे पोस्टरदेखील प्रसिद्ध झाले.

हे वाचलं का?

मेजर शहीद संदीप उन्नीकृष्णन हे केरळचे रहिवासी होते. याशिवाय ते मल्याळी भाषक होता. अशा परिस्थितीत मल्याळम भाषेत या अमर तरुण शहीदची गाथा पाहणं हे त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी गोष्ट असणार आहे. चित्रपटाचा टीझर 28 मार्च रोजी मुंबईत रिलीज होणार होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो आता १२ एप्रिलला रिलीज करण्यात येणार आहे.

या सिनेमातील भूमिकेसाठी दक्षिण अभिनेता आदिवी शेष यांनी खूप मेहनत घेतली आहे. शिवाय नुकताच या सिनेमातील अभिनेत्री साई मांजरेकरचा पहिला लूक रिलीज करण्यात आला होता. चित्रपटासाठी सईने तेलगू भाषाही शिकली. या सिनेमाच्या माध्यामातून मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना श्रद्धांजली देण्यात येणार आहे.

मेजर सिनेमा 2 जुलै 2021 रोजी रिलीज करण्यात येईल. या सिनेमाता सोभिता धुलीपाला, सई मांजरेकर, प्रकाश राज हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सशी किरण टिक्का यांनी केलं आहे. तेलुगू सुपरस्टार महेश बाबूंच्या प्रॉडक्शनमध्ये हा सिनेमा तयार झाला आहे.

    follow whatsapp