पुण्यात सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला चक्क १०० ते १२५ जणांची बाईक रॅली निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धनकवडी ते कात्रज स्मशानभुमी या भागात हा प्रकार घडला. या प्रकरणात सहकारनगर पोलीस ठाण्यात २०० जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
कोरोनाची साखळी मोडण्यासाठी शहरात निर्बंध लागू केले असतानाही एखाद्या गुन्हेगाराच्या अंत्यविधीसाठी अशा पद्धतीने जर रॅली काढण्यात आल्यामुळे शहरात चर्चेला उधाण आलं आहे. एका टोळक्याने शुक्रवारी मध्यरात्री सराईत गुन्हेगार माधव वाघाटेचा खून केला. यानंतर शनिवारी दुपारी साडेबारा वाजल्याच्या सुमारास कात्रज स्मशानभूमीत माधव वाघाटेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
माधव वाघाटेच्या साथीदारांनी यावेळी बाईकची रॅली काढत ते धनकवडी आणि कात्रज स्मशानभूमीवर विना परवानगी रॅली काढत नियमांचा भंग केला. तसेच या रॅलीत कोणत्याही व्यक्तीने मास्क घातलेला नव्हता…ज्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्ह्याची नोंद केली आहे. सिद्धार्थ पलंगे, कुणाल चव्हाण, सुनील खाटपे, अमित खाटपे, सौरभ भगत, राजकुमार परदेशी, ऋषिकेश भगत, गणेश फाळके यांच्यासह अन्य लोकांनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरार : हळदीच्या कार्यक्रमात फ्री-स्टाईल हाणामारी, मद्यधुंद अवस्थेत ३-४ गट आपापसात भिडले
ADVERTISEMENT
