पुण्यातील ‘त्या’ पुलावरुन रंगली श्रेयवादाची लढाई; भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने

मुंबई तक

• 11:00 AM • 04 Sep 2022

पुणे: पुण्यातील पाषाण सूस खिंडीतील उड्डाणपुलावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या पुलाची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी स्थानिक लोकांनी आणि काही कार्यकर्त्यांनी पुलाचं उद्घाटन केलं. मात्र भाजपनं याला विरोध केला आहे. कारण सर्विस रोडचं काम अजून पूर्ण झालेलं नाही मग त्याअगोदर उद्घाटन कसं असा सवाल भाजपनं केला आहे. […]

Mumbaitak
follow google news

पुणे: पुण्यातील पाषाण सूस खिंडीतील उड्डाणपुलावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या पुलाची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी स्थानिक लोकांनी आणि काही कार्यकर्त्यांनी पुलाचं उद्घाटन केलं. मात्र भाजपनं याला विरोध केला आहे. कारण सर्विस रोडचं काम अजून पूर्ण झालेलं नाही मग त्याअगोदर उद्घाटन कसं असा सवाल भाजपनं केला आहे.

हे वाचलं का?

सुप्रिया सुळे याबाबत काय म्हणाल्या?

भाजप-राष्ट्रवादीच्या श्रेयवादाच्या लढाईवरती सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ”स्थानिक लोकांची इच्छा असते की एखादं काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं उद्घाटन व्हावं. कारण त्यांना समस्यांचा सामना करावा लागत असतो. म्हणून त्या अनुषंगाने त्यांनी उद्घाटन केलं असावं. यामध्ये कुठेही श्रेयवादाचा विषय येत नाही. देशात पेट्रोल-डिझेल वाढलेले आहे त्यामुळे लोकांना सुविधा मिळणं गरजेचं आहे.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

भाजपचं यावरती काय म्हणणं आहे?

उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या सर्विस रोडचं काम अपूर्ण असल्यानं भाजपनं या पुलाच्या उद्धाटनाला विरोध केला आहे. 9 सप्टेंबर रोजी या पुलाचं काम पूर्ण होईल त्यावेळी भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील या पुलाचं उद्घाटन करतील असं भाजपच्यावतीनं सांगण्यात आलं आहे. भाजप-राष्ट्रवादीच्या या श्रेयवादाच्या लढाईत स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री नेहमीच टीव्हीवरती दिसतात

दरम्यान सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीसांच्या गाठीभेटीवरती सडकून टीका केली आहे. ”गाठीभेटी आणि होम व्हिजिट सोडून या सरकारच्या फारश्या काही बातम्या दिसत नाहीत. जे दौरे दिसतात ते एक किलोमीटरच्या आतले आहेत. मी जेव्हा जेव्हा टीव्ही बघते तेव्हा मला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नेहमीच कुणाच्या तरी घरीच दिसतात.”

पुण्यात माध्यामांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा ५० खोके घेतल्याचं वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या “राज्यातील सत्ताधाऱ्यांनी 50 खोके घेऊन लाल दिवा ओरबाडून मिळवला. साम, दाम, दंड भेद सर्व काही ओक्के करून हे सरकार ओरबाडून आणलं गेलंय. त्यांचा उत्साह फक्त लाल दिव्यांचाच होतात”. ज्या उत्साहानं आमचं सरकार पाडलं त्या उत्साहाने कामं होत नाहीत. अडीच महिन्यात काही काम होताना दिसत नाहीत. अशी टीकाही सुप्रिया सुळेंनी केली आहे.

    follow whatsapp