‘तात्काळ हिला बेड्या ठोका’; चित्रा वाघ चिडल्या, ऊर्फी जावेदही भडकली

आपल्या वेगवेगळ्या वेशभूषेमुळे नेहमी चर्चेत राहणारी ऊर्फी जावेद आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ समोरासमोर आल्या आहेत. ऊर्फी जावेदच्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी चीड व्यक्त करत तिला बेड्या ठोकण्याची मागणी केली. त्यानंतर ऊर्फी जावेदनंही चित्रा वाघ यांना उत्तर दिलंय. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्यांना ऊर्फी जावेद हे नाव माहितीच असेल. ऊर्फी जावेद नेहमी तिच्या कपड्यामुळे चर्चेत असते. […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:17 AM • 31 Dec 2022

follow google news

आपल्या वेगवेगळ्या वेशभूषेमुळे नेहमी चर्चेत राहणारी ऊर्फी जावेद आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ समोरासमोर आल्या आहेत. ऊर्फी जावेदच्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी चीड व्यक्त करत तिला बेड्या ठोकण्याची मागणी केली. त्यानंतर ऊर्फी जावेदनंही चित्रा वाघ यांना उत्तर दिलंय.

हे वाचलं का?

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्यांना ऊर्फी जावेद हे नाव माहितीच असेल. ऊर्फी जावेद नेहमी तिच्या कपड्यामुळे चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. असे चित्र विचित्र फॅशनमुळे ट्रोल केलं जातं. आता ऊर्फी जावेदच्या वेशभूषेवर चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला.

शुटिंगवेळी ऊर्फी जावेदचा घसरला पाय, झोक्यावरून पडली खाली

चित्रा वाघांची टीका, ऊर्फी जावेदचं उत्तर, बघा काय घडलं?

ऊर्फी जावेदचा एक व्हिडीओ शेअर करत चित्रा वाघ संतापल्या. त्यानंतर ऊर्फी जावेदनंही तुमच्यासारखे राजकारणी म्हणत उत्तर दिलं. दोघींमध्ये ट्विटरवर वाद रंगला.

दिलखेच अदांनी घायाळ करणारी उर्फी जावेद किती घेते फीस?

चित्रा वाघ म्हणाल्या, “शी…ऽऽऽऽ अरे… हे काय चाललयं मुंबईत? रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्ताणपणे नंगटपणा करणारी ही बाई, हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC (कायदे) आहेत की नाही?”, असा सवाल चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांना केला.

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, “तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत, तर ही बया अजून विकृती पसरवतीये”, अशी टीका ऊर्फी जावेदवर चित्रा वाघ यांनी केली.

ऊर्फी जावेदनं चित्रा वाघ यांना काय दिलं उत्तर?

चित्रा वाघ यांच्या ट्विटवर ऊर्फीने कमेंट केलीये. “महिला सुरक्षेच्या मार्गात तुमच्यासारखे राजकारणी अडथळा आहेत. माझा मुद्दा पुढे करून जनतेचं लक्ष विचलित करायचंय. ज्यांना मदतीची गरज आहे अशा महिलांसाठी तुम्ही का काही करत नाही? महिलांचं शिक्षण, बलात्काराची लाखो प्रलंबित प्रकरणं? का तुम्ही काही करत नाही?”, असं म्हणत ऊर्फीने चित्रा वाघ यांनाच उलट सवाल केलाय.

    follow whatsapp