Pooja Chavan प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी-पंकजा मुंडे

मुंबई तक

• 11:35 AM • 01 Mar 2021

पूजा चव्हाण प्रकरणात सरकारने निःपक्षपातीपणे चौकशी करावी अशी मागणी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. सरकार टिकवण्यासाठी चुकीच्या गोष्टी पाठिशी घालू नये असाही सल्लाही पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. संजय राठोड यांनी राजीनामा आधीच द्यायला हवा होता. आता राजीनामा दिल्याने प्रतिमा मलीन झाली. राजीनामा दिला की घेतला गेला हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न […]

Mumbaitak
follow google news

पूजा चव्हाण प्रकरणात सरकारने निःपक्षपातीपणे चौकशी करावी अशी मागणी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. सरकार टिकवण्यासाठी चुकीच्या गोष्टी पाठिशी घालू नये असाही सल्लाही पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. संजय राठोड यांनी राजीनामा आधीच द्यायला हवा होता. आता राजीनामा दिल्याने प्रतिमा मलीन झाली. राजीनामा दिला की घेतला गेला हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. सरकारने निःपक्षपातीपणे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे आणि पूजाला न्याय मिळवून द्यायला हवा असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

धनंयज मुंडे यांच्यावरही आरोप झाला आहे त्यांनी राजीनामा द्यायला हवा का? असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की आमची तर मागणीच आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. एखाद्या स्त्रीकडून जेव्हा आरोप केले जातात त्यावेळी ती महिला आहे ही बाब आधी लक्षात घेतली पाहिजे. करण्यात आलेले आरोप हे गंभीरच आहेत. आपल्या राज्यात राहणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही महिलेला, सामान्य महिलेला सुरक्षित वाटलं पाहिजे असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. जसा राठोडांनी राजीनामा दिला तसाच राजीनामा धनंजय मुंडे यांनीही दिला पाहिजे अशी आमची मागणी आहेच.

मी दसरा मेळावा घेतला तर माझ्यावर गुन्हा दाखल झाला

मी दसरा मेळावा ऑनलाईन घेण्याचं जाहीर केलं होतं. मी लोकांना आवाहन केलं होतं की मी ऑनलाईन बोलणार आहे तरीही माझ्यावर दुसऱ्या क्षणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर लोक इथे आल्यावर जेसीबीने गुलाल उधळला गेला. त्यावर कुणी काहीच बोलत नाही. असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांनाही टोला लगावला. रेणू शर्मा प्रकरणात जेव्हा आरोप झाले होते त्यानंतर धनंजय मुंडे बीड, परळीमध्ये आले होते त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी गर्दी झाली होती. गुलाल जेसीबीने उधळण्यात आला होता. हाच धागा पकडून पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला.

    follow whatsapp