भाजपने आमच्यासाठी मुख्यमंत्रीपद सोडलं, मग आम्ही ‘ती’ जागा सोडली तर…. : दीपक केसरकर

मुंबई तक

• 03:18 PM • 13 Oct 2022

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार ऋतुजा लटके असणार आहेत. त्या उद्या (शुक्रवारी) सकाळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार आहेत. तर बाळासाहेबांची शिवसेना-भाजप युतीमध्ये या जागेवर भाजप उमेदवार देणार हेही जवळपास निश्चित झालं आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये तेही उद्याच […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार ऋतुजा लटके असणार आहेत. त्या उद्या (शुक्रवारी) सकाळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार आहेत. तर बाळासाहेबांची शिवसेना-भाजप युतीमध्ये या जागेवर भाजप उमेदवार देणार हेही जवळपास निश्चित झालं आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये तेही उद्याच अर्ज दाखल करणार आहेत.

हे वाचलं का?

उमेदवारचं नसल्यानं शिंदे गटाची माघार?

विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाकडे उमेदवारचं नसल्यानं त्यांनी ही जागा भाजपला सोडली आहे. शिंदे गटाचे नेते ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र त्या अखेरपर्यंत ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्यावर ठाम राहिल्या. त्यानंतर शिंदे गटातून मुरजी पटेल यांनाच उमेदवारी देता येते का? याचीही चाचपणी केली. मात्र त्यातही फारसी यश आलं नाही. त्यामुळे अखेर शिंदे गटाने अंधेरीची जागा भाजपला सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचीही माहिती आहे.

भाजपने आमच्यासाठी मुख्यमंत्रीपद सोडलं :

या सगळ्यावर बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले, जो उमेदवार असेल तो महायुतीचा उमेदवार असणार आहे. पण ती जागा कोण लढवणार याबाबतचा निर्णय शिंदे – फडणवीस साहेब एकत्र बसून घेतील. उद्या सकाळी युतीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करु. आमच्यामध्ये कधीही भेदभाव राहिलेला नाही. आमच्यासाठी भाजपने मुख्यमंत्रीपद सोडलं, त्यामुळे उद्या कदाचित ती जागा भाजपला सोडली तर गेली तर खूप मोठं काही झालं असं सुद्धा उद्या विरोधकांची बोलण्याची तयारी असणार आहे.

पण ते या गोष्टीची जाणिव ठेवत नाहीत की दुप्पट संख्याबळ असतानाही त्यांनी आमचा मुख्यमंत्री दिला आहे. एकदिलाने महाराष्ट्रात राज्य करत आहेत. या पार्श्वभूमीवर जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो शिंदे-फडणवीस एकत्र बसून घेतील. मी असं अजिबात म्हणतं नाही की शिंदे साहेबांना ही जागा लढायची नाही, किंवा फडणवीस साहेब लढविणार आहेत, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो ते एकत्र बसून घेतली.

स्थानिक स्थितीचा अभ्यास करुन प्रत्येक पक्षाची ताकद ते विचारात घेतील. शेवटी निवडणुका जिंकण्यासाठी लढायच्या असतात. ही लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी आहे. युतीला घेरण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झालेला आहे. त्यामुळे तिथलं मतदान लक्षात घेऊन बारीक विचार करुन त्याचा निर्णय घेतला जाईल.

    follow whatsapp