”शरद पवारांचं संपूर्ण आयुष्य तोडफोडीत गेलं”- बावनकुळे; उद्धव ठाकरेंनाही लगावला टोला

मुंबई तक

29 Aug 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:48 AM)

भास्कर मेहेरे, प्रतिनिधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज ठाण्यामध्ये होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारपासून राज्य सरकारवरती सडकून टीका केली होती. यालाच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. शरद पवारांवरती जहरी टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवरतीही निशाणा साधला आहे. शरद पवारांच्या टीकेवरती काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? […]

Mumbaitak
follow google news

भास्कर मेहेरे, प्रतिनिधी

हे वाचलं का?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज ठाण्यामध्ये होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारपासून राज्य सरकारवरती सडकून टीका केली होती. यालाच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. शरद पवारांवरती जहरी टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवरतीही निशाणा साधला आहे.

शरद पवारांच्या टीकेवरती काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

”शरद पवारांच्या संपूर्ण आयुष्याचा इतिहास बघितला तर संपूर्ण आयुष्य तोडफोडीत गेलं आहे. स्वतःच्या भरवश्यावर 100 आमदार कधी आणले नाहीत. जेव्हा जेव्हा सत्ता मिळवली तेव्हा तेव्हा तोडफोडीतुन मिळवली” अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले ”मोदींनी 8 वर्षामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचं काम केलं आहे. याचं प्रमाणपत्र जनता देत आहे शरद पवारांच्या सर्टिफिकेटची गरज नाही”

उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवरती निशाणा तर साधलाच त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. ”हिंदुत्व शिवसेनेचं नाहीच, शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे, उद्धव ठाकरेंची नाही. उध्दव ठाकरेंचा फक्त गट राहिला आहे. हिंदुत्ववादी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे”.

”40 आमदार 12 खासदार सोडून गेले कारण त्यांनी आपले हिंदुत्ववादी विचार सोडले. गेले अडीच वर्षे जर पाहिले तर हिंदू विरोधी काम केले आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार करून महाराष्ट्रामध्ये कुठे फिरण्यात अर्थ नाही त्यामुळे त्यांनी शरद पवार सोबत दौरा करावा” असा खोचक टोला देखील बावनकुळेंनी लगावला आहे.

शरद पवार मोदी सरकार विरोधात काय म्हणाले?

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर आणि राज्यातील सत्ता पाडण्याबद्दल पवार म्हणाले, “राजकीय नेतृत्वाकडून काही ना काही कारणातून कुणावर खटले, कुणामागे ईडी, कुणामागे सीबीआय लावता येईल का, हे प्रकार सुरु आहेत. हे महाराष्ट्रातच नाहीये. गुजरात, झारखंडमध्येही याच तक्रारी आहेत. ज्या ठिकाणी आज केंद्रात ज्यांची सत्ता आहे, पण राज्यात त्यांची सत्ता नाहीये, अशा ठिकाणी सत्तेवर असलेल्या सरकारला सत्तेपासून दूर करायचं. हाही एक उपक्रम भाजपनं अनेक राज्यांमध्ये ज्याठिकाणी बिगर भाजपची सरकार आहे, तिथे घेतला गेला.”

“कर्नाटकात आज भाजपचं सरकार आहे. कर्नाटकात भाजपचं सरकार नव्हतं. सरकारमधील लोक फोडून त्यांच्या मदतीने भाजपनं सरकार स्थापन केलं. महाराष्ट्रात शिवसेनेतला एक वर्ग बाजूला केला आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं. मध्य प्रदेशात कमलनाथ यांचं सरकार पाडलं. तिथे भाजपचं सरकार आणलं गेलं. हे चित्र आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळतंय”, असं शरद पवार म्हणाले.

    follow whatsapp