पुणे : LPG Gas चा काळाबाजार करणाऱ्या पाच जणांना रंगेहाथ पकडलं

पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस चोरून सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये गॅस वितरक आणि गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य लोकं मेटाकुटीला आले असताना दौंड अशा पद्धतीचा काळाबाजार […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 04:12 PM • 03 Sep 2021

follow google news

पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस चोरून सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये गॅस वितरक आणि गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

हे वाचलं का?

गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य लोकं मेटाकुटीला आले असताना दौंड अशा पद्धतीचा काळाबाजार उघड झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दौंड शहरात गॅस वितरण करणाऱ्या वितरकांकडून शहरातील यादव वस्ती जवळ भरलेल्या घरगुती एचपी गॅस सिलेंडर मधुन दुसऱ्या रिकाम्या गॅसच्या टाकीमध्ये मशीनच्या सहाय्याने धोकादायक पध्दतीने गॅस भरताना. सहाय्य पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी आणि त्यांच्या टीमने रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी दौंड पोलिसांनी दोन गॅस पुरवठा करणारी वाहने आणि चार 5 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून 9 लाख 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये वाहने आणि 37 भरलेल्या टाक्या आणि 33 रिकाम्या गॅसच्या टाक्या जप्त केल्या आहेत. संबंधित टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मात्र दौंड शहरात खळबळ उडाली आहे.

NCP च्या कार्यकर्त्याकडून Pune ग्रामीणमधल्या महिला सरपंचाला मारहाण, चित्रा वाघ यांचा आरोप

    follow whatsapp