बॉलिवूड कलाकारांच्या मागे कोरोनाचं ग्रहण; अक्षय आणि गोविंदानंतर अजून 2 कलाकारांची भर

मुंबई तक

• 07:43 AM • 05 Apr 2021

कोरोनाच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होतेय. बरेच बॉलिवूड सेलेब्रिटीही या विषाणूच्या संसर्गाला बळी पडतायत. काल अभिनेता अक्षय कुमार तसंच गोविंदा यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तर यामध्ये आता अजून काही सेलिब्रिटींची भर पडली आहे. उरी फेम अभिनेता विकी कौशलला कोरोना झालाय. विकीने स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिलीये. विकी त्याच्या पोस्टमध्ये म्हणतो, […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होतेय. बरेच बॉलिवूड सेलेब्रिटीही या विषाणूच्या संसर्गाला बळी पडतायत. काल अभिनेता अक्षय कुमार तसंच गोविंदा यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तर यामध्ये आता अजून काही सेलिब्रिटींची भर पडली आहे.

हे वाचलं का?

उरी फेम अभिनेता विकी कौशलला कोरोना झालाय. विकीने स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिलीये. विकी त्याच्या पोस्टमध्ये म्हणतो, “काळजी घेऊन देखील दुर्देवाने मला कोरोनाची लागण झाली आहे. मी सध्या डॉक्टरांनी दिलेली औषधं घेत असून घरातच क्वारंटाइन आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी. सगळ्यांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.”

याशिवाय बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिची देखील कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आलाय. “मला कोरोनाची लक्षणं आढळून आली असून मी स्वत:ला घरीच क्वारंटाईन केलंय. मी डॉक्टरांनी दिलेल्या प्रोटोकॉलचं पालन करतेय. कोणीही माझ्या संपर्कात आले असल्यास कृपया आपली चाचणी करून घ्या. मी स्टीम, व्हिटॅमिन सी तसंच पौष्टीक आहार घेतेय. कृपया सध्याच्या परिस्थितीला हलक्यात घेऊ नका. मी देखील सर्व खबरदारी घेतली होती तरीही मी या विळख्यात अडकले. नेहमी मास्क घाला, आपले हात स्वच्छ धुवा.” अशी पोस्ट भूमीने सोशल मीडियावर केली आहे.

तर दुसरीकडे अभिनेता अक्षय कुमारला काल कोरोनाची लागण झाली होती आणि तो होम क्वारंटाइन असल्याची माहिती त्याने दिलेली. मात्र आज सकाळी अक्षयला रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. या संदर्भात अक्षयने सोशल मीडियावर पोस्ट केलं असून तो म्हणतो, “तुमच्या सर्व शुभेच्छा आणि प्रार्थनांबद्दल धन्यवाद. मी आता बरा आहे, परंतु वैद्यकीय सल्ल्यानुसार खबरदारी म्हणून मी रुग्णालयात दाखल होतोय. मला लवकरच घरी परत येण्याची आशा आहे. काळजी घ्या.”

    follow whatsapp