मुंबईतल्या ५ महिन्याच्या चिमुकल्या तीरा कामत साठी केंद्र सरकारसाठी महत्वाचं पाऊल उचललं आहे. काही महिन्यांपूर्वी तीराला स्पायनल मस्क्युलर एस्ट्रॉफी या आजाराचं निदान झालं होतं. या आजारावर लागणाऱ्या उपचारासाठी औषध व इंजेक्शनचा खर्च हा १६ कोटींच्या घरात जाणार असल्यामुळे कामत कुटुंबावर संकट आलं होतं. अखेरीस प्रसारमाध्यमांच्या मदतीने क्राऊड फंडींगच्या माध्यमातून औषधं आणि इंजेक्शनसाठीच्या पैशांची सोय कामत कुटुंबाने केली. परंतू अमेरिकेवरुन ही औषधं भारतात आणण्यासाठी कामत कुटुंबांना ६ कोटीचं आयात शुल्क भरावं लागणार होतं.
ADVERTISEMENT
हे आयात शुल्क माफ करण्यात यावं यासाठी कामत कुटुंबाने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे व इतर राजकीय नेत्यांचीही भेट घेतली. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीरा कामतसाठी लागणाऱ्या इंजेक्शनवरचं आयात शुल्क माफ करण्यात यावं असं विनंती करणारं पत्र लिहीलं. यानंतर केंद्र सरकारने या इंजेक्शनवरील आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तीरासाठी लागणारं इंजेक्शन आता भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तीराच्या जन्मानंतर दोन आठवड्यांमध्येच तिला त्रास जाणवायला लागला. यानंतर कामत कुटुंबांच्या रुग्णालयातल्या फेऱ्या वाढायला लागल्या. तीराला झालेला आजार निदान करण्यासाठी काही कालावधी गेल्यानंतर या आजारावरचे उपचार भारतात होत नसून यासाठीची औषधं अमेरिकेतील फार्मा कंपनीत मिळतात असं कामत कुटुंबांना कळलं. यानंतर क्राऊड फंडींगच्या माध्यमातून कामत कुटुंबाने १६ कोटींची रक्कम उभी केली.
ADVERTISEMENT
