Anant Geete: ”कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हावं लागेल, महाराष्ट्रात निवडणुका होतील”

मुंबई तक

23 Jul 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:54 AM)

रत्नागिरी: माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते यांनी मोठे भाकीत केले आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत अनंत गीते यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हावं लागेल तसेच त्यानंतर महाराष्ट्रात त्यांचं सरकार येणार नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल आणि त्यानंतर कदाचित गुजरातबरोबर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होतील, असं माझं भाकीत असल्याचं अनंत गिते म्हणाले आहेत. […]

Mumbaitak
follow google news

रत्नागिरी: माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते यांनी मोठे भाकीत केले आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत अनंत गीते यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हावं लागेल तसेच त्यानंतर महाराष्ट्रात त्यांचं सरकार येणार नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल आणि त्यानंतर कदाचित गुजरातबरोबर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होतील, असं माझं भाकीत असल्याचं अनंत गिते म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

”अनेक लखोबा लोखंडे आहेत, त्यापैकी एक रत्नागिरीत”

रत्नागिरीतील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, ज्येष्ठ शिवसैनिक उदय यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात अनंत गीते बोलत होते. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी उदय सामंतांवर देखील टीका केली आहे. ”अनेक लखोबा लोखंडे आहेत, त्यापैकी एक रत्नागिरीत आहेत” असे गितेंनी नाव न घेता उदय सामंतांवर टीका केली आहे.

आम्हाला राजकीय जन्म देणारी आई संकटात- अनंत गिते

पुढे गिते म्हणाले ”घराघरांत कलह आहेत, वाद आहेत आणि आपली आई संकटात असेल तर आपण कलह करत बसणार नाही, तर आईला वाचवणार. आज शिवसेना संकटात आहे, ही आपली आई संकटात आहे. आपल्याला आईला वाचवायचं आहे. आम्हाला राजकीय जन्म देणारी शिवसेना माता आहे, आणि ही आई आज संकटात आहे, तिला आपल्याला वाचवायचं आहे.”

‘उद्धवजींच्या अश्रूंचा आपण महापूर केला पाहिजे

”उद्धवजींच्या अश्रूंचा आपण महापूर केला पाहिजे, आणि यामध्ये या गद्दारांना गाडून टाका” असेही गिते म्हणाले आहेत. एकनाथ शिदेंसह ४० आमदारांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानतंर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात मागच्या काही काळापासून संघर्ष चालू आहे. आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून ते शिवसैनिकांना संबोधित करत आहेत.

एकनाथ शिंदेंचं बंड भाजप पुरस्कृत

दरम्यान सकाळी अनंत गितेंनी मोठं वक्तव्य केलं होतं. छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी जे बंड केलं ते बंड स्वबळावर केलं होतं. एकनाथ शिंदे यांचं बंड भाजप पुरस्कृत आहे अशी घणाघाती टीका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार अनंत गीते यांनी रत्नागिरीत केली आहे. एवढंच नाही तर शिवसेनेने यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात असंही त्यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी स्वबळावर बंड केलं. राणेंच्या बंडाला काँग्रेसने सहकार जरुर केला, पण त्या बंडाचे पुरस्कर्ते काँग्रेस नव्हती. त्या बंडाचं कारस्थान काँग्रेसने रचलेलं नव्हतं. मात्र सध्याचं बंड हे भाजप पुरस्कृत, भाजप रचित हे बंड असल्याची टीका गीते यांनी केली.

    follow whatsapp