जस्टिस यूयू लळित होणार नवे चीफ जस्टिस? CJI रमणा यांनी केली नावाची शिफारस

मुंबई तक

• 07:18 AM • 04 Aug 2022

49th Chief Justice of India: जस्टिस यूयू लळित हे पुढचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असू शकतात. भारताचे सध्याचे CJI एन. वी. रमणा यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली आहे अशी माहिती समोर आली आहे. उदय उमेश लळित अर्थात यूयू लळित यांच्या नावाची शिफारस असलेला लिफाफा त्यांनी सीलबंद करून कायदा मंत्र्यांकडे सोपवला आहे. जी परंपरा चालत आली […]

Mumbaitak
follow google news

49th Chief Justice of India: जस्टिस यूयू लळित हे पुढचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असू शकतात. भारताचे सध्याचे CJI एन. वी. रमणा यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली आहे अशी माहिती समोर आली आहे. उदय उमेश लळित अर्थात यूयू लळित यांच्या नावाची शिफारस असलेला लिफाफा त्यांनी सीलबंद करून कायदा मंत्र्यांकडे सोपवला आहे. जी परंपरा चालत आली आहे त्यानुसार सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश हे त्यांच्या वरिष्ठतेच्या आधारावर CJI चं पद सांभाळतात.

हे वाचलं का?

जस्टिस यूयू लळित होणार नवे चीफ जस्टिस

जस्टिस यूयू लळित यांच्या नावाची शिफारस मान्य करण्यात आली तर देशाचे ४९ वे CJI होतील. एन. व्ही. रमणा यांचा कार्यकाळ २६ ऑगस्टला संपतो आहे ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर आता यूयू लळित यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी CJI एन. व्ही. रामणा यांना पत्र लिहून नव्या सीजेआयच्या नावाची शिफारस करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर रमणा यांनी पत्र लिहून यूयू लळित यांच्या नावाची शिफारस केली आहे.

जी परंपरा आहे त्यानुसार आपल्या सेवानिवृत्तीच्या एक महिना आधी चीफ जस्टिस बंद लिफाफ्यात आपल्या उत्तराधिकाऱ्यांचं नाव कायदा आणि न्याय मंत्रालयाला कळवतं. मंत्रालय हे नाव राष्ट्रपतींना कळवतं. सुप्रीम कोर्टात वरिष्ठ न्यायाधीश यांनी वरिष्ठता क्रमांक दोनचं नावच लिफाफ्यात असतं. चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचा कार्यकाळ निश्चित स्वरूपाचा नसतो. सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या सेवानिवृत्तीचं वय संविधानानुसार ६५ वर्षे आहे.

सुप्रीम कोर्टात दशकभराने चार महिन्यांच्या अंतराने चीफ जस्टिस ऑफ इंडिया पाहण्यास मिळत आहेत. याच वर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात जस्टिस उदय उमेश लळित आणि जस्टिस धनंजय चंद्रचूड हे मुख्य न्यायाधीश बनतील. हा योगायोग आता थेट २०२७ मध्ये येईल. २०१७ मध्येही असंच घडलं होतं.

    follow whatsapp