द्रौपदी मुर्मूंना निवडणुकीत महाराष्ट्रातले २०० आमदार मतदान करतील, एकनाथ शिंदे यांचा दावा

ऋत्विक भालेकर

• 01:23 PM • 14 Jul 2022

द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार आहेत. त्या आजच मुंबईत आल्या आहेत. एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर द्रौपदी मुर्मू आहेत. अशात द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातले २०० आमदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करतील असा दावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आज झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. Aurngabad : हॅलो मुख्यमंत्री एकनाथ […]

Mumbaitak
follow google news

द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार आहेत. त्या आजच मुंबईत आल्या आहेत. एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर द्रौपदी मुर्मू आहेत. अशात द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातले २०० आमदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करतील असा दावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आज झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.

हे वाचलं का?

Aurngabad : हॅलो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतोय, जखमी वारकऱ्यासाठी थेट रूग्णालयात फोन

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी त्या एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर असून या भेटीत त्या शिवसेना भाजप खासदार आणि आमदारांची लीला हॉटेलमध्ये भेट घेणार आहेत.

शिवसेना द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देणार की नाही हा खरा प्रश्न होता. कारण शिवसेनेत जी फाटाफूट झाली त्यानंतर उद्धव ठाकरे पाठिंबा देणार नाहीत अशी चर्चा होती. मात्र आदिवसी नेत्यांच्या आग्रहाखातर आपण द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं. तसंच द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला ते योग्यच केलं असं संजय राऊत यांनीही म्हटलं आहे. अशात आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्रौपदी मुर्मू यांना २०० आमदार मतदान करतील असा दावा केला आहे.

Eknath Shinde : “देवेंद्र फडणवीस आणि मी मिळून २०० आमदार निवडून आणणार”

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर जे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं त्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस आणि मी मिळून २०० आमदार निवडून आणू असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता. आता त्यापाठोपाठ राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातले २०० आमदार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

द्रौपदी मुर्मू या ओदिशातील आदिवासी नेत्या आहेत. त्या झारखंडच्या नवव्या राज्यपालदेखील होत्या. द्रौपदी मुर्मू या ओदिशाच्या रायरंगपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्या ओदिशाच्या पहिल्या नेत्या आहेत. याआधी भाजप-BJD युती सरकारमध्ये २००२ ते २००४ पर्यंत त्या मंत्रीही होत्या.

    follow whatsapp