CM शिंदे दावोसवरुन परतले; येताना ‘इतकी’ गुंतवणूक अन् रोजगार घेवून आले!

ऋत्विक भालेकर

18 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:15 AM)

Eknath Shinde return from Davos 2023 : मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बुधवारी (18 जानेवारी) रोजी दावोसवरुन मुंबईत परतले. दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास वाकोला येथील विमानतळ गेट क्र. 8 मध्ये त्यांचं आगमन झालं. त्यांच्या स्वागतासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव […]

Mumbaitak
follow google news

Eknath Shinde return from Davos 2023 : मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बुधवारी (18 जानेवारी) रोजी दावोसवरुन मुंबईत परतले. दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास वाकोला येथील विमानतळ गेट क्र. 8 मध्ये त्यांचं आगमन झालं. त्यांच्या स्वागतासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित होते.

हे वाचलं का?

दरम्यान, दावोसमधून परत येताना एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रासाठी तब्बल 1 लाख 37 हजार कोटींची गुंतवणूक आणि हजारो तरुणांसाठी रोजगार आणला आहे. स्वतः शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली. दावोसमधील World Economic forum मध्ये महाराष्ट्राचा डंका वाजला असून तब्बल 1 लाख 37 हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

कोणत्या क्षेत्रात किती गुंतवणूक?

  • उच्चतंत्र, पायाभूत सुविधा – 54, 276कोटी

  • ऊर्जा – 46, 800 कोटी

  • आयटी, फिनटेक आणि डेटा – 32, 414 कोटी

  • स्टील उत्पादन – 2200 कोटी

  • कृषि, अन्न प्रक्रिया – 1900 कोटी

दावोस परिषदेतील महाराष्ट्रासोबतच्या करारांचं स्वरुप :

1) पुणे – रुखी फूड्स – ग्रीन फिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प – 250 कोटी गुंतवणूक

2) पुणे – निप्रो कार्पोरेशन (जपान) – ग्लास ट्युबिंग प्रकल्प – 1,650 कोटी गुंतवणूक – (2000 रोजगार निर्मिती)

3) पुणे-पिंपरी – एलाईट प्लास्ट अँटो सिस्टीम्स (पोर्तुगाल) – प्लास्टिक ऑटोमोटिव्ह प्रकल्प – 400 कोटी गुंतवणूक – (2000 रोजगार निर्मिती)

4) मुंबई – इंड्स कॅपिटल पार्टनर्स – आरोग्य, तंत्रज्ञान, संरक्षण सेवा – 16000 कोटी गुंतवणूक

5) मुंबई महानगर- कॅलिफॉर्निया विद्यापीठ (बर्कले) – स्मार्ट व्हिलेज सामंजस्य करार –

6) औरंगाबाद – ग्रीनको – नवीनीकरण ऊर्जा (रिन्युएबल एनर्जी) प्रकल्प – 12,000 कोटी गुंतवणूक – (6,300 रोजगार निर्मिती)

7) चंद्रपूर- भद्रावती – न्यू एरा क्लीनटेक सोल्युशन (अमेरिका) – कोल गॅसिफिकेशन प्रकल्प – 20,000 कोटी गुंतवणूक – (15,000 रोजगार निर्मिती)

8) चंद्रपूर -मूल – राजुरी स्टील अँड अलाईज (इस्राईल) – स्टील प्रकल्प – 600 कोटी गुंतवणूक – (1000 रोजगार निर्मिती)

9) गडचिरोली – चार्मिशी – वरद फेरो अलाईज – स्टील प्रकल्प – 1,520 कोटी गुंतवणूक – (2000 रोजगार निर्मिती)

10) महाराष्ट्र – गोगोरो इंजिनीअरिंग & बडवे इंजिनीअरिंग – ऑटो प्रकल्प – 20,000 कोटी गुंतवणूक – (30,000 रोजगार निर्मिती)

11) महाराष्ट्र – बर्कशायर- हाथवे – नागरी पायाभूत सुविधा – 16,000 कोटी गुंतवणूक

12) महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल, 10,000 कोटी गुंतवणूक – (3000 रोजगार निर्मिती)

13) आरक्यूब / आर्क डेटा सेंटर्स लि. – 12000 कोटी गुंतवणूक – (1,200 रोजगार निर्मिती)

14) हंस इन्फ्रोसोल्युशन प्रा. लि. वूडवीन -4000 कोटी गुंतवणूक – (800 रोजगार निर्मिती)

    follow whatsapp