CM Yogi Aadityanath : "परिस्थिती नियंत्रणात, पण गर्दीचा जोर कायम...", चेंगराचेंगरनंतर योगींचं काय आवाहन?

मुंबई तक

29 Jan 2025 (अपडेटेड: 29 Jan 2025, 11:15 AM)

वेगवेगळ्या मार्गांवर धावणाऱ्या कुंभमेळ्याच्या विशेष गाड्या नेहमीप्रमाणे सुरू आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शनवरून प्रयागराजला येणाऱ्या कुंभमेळ्याच्या विशेष गाड्याच थांबवण्यात आल्या आहेत.

MumbaiTak
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 10 पेक्षा जास्त मृत्यू

point

चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया

point

दुर्घटनेनंतर यंत्रणा अलर्ट मोडवर, CM योगी यांनी काय आवाहन केलं?

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभ मेळ्यातील रात्री झालेल्या दुर्घटनेमध्ये 10 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेला आवाहन करत पहिल्यांदाच एक व्हिडीओ जारी केला आहे. जिथे असाल तिथेच जवळच्या घाटावर स्नान करा. संगम नोच जवळ येण्याचा आग्रह करू नका. लहान मुलं, वयोवृद्ध लोक, श्वसनाचे आजार असलेल्या लोकांनी गर्दीत जाऊ नका. संगमावर स्नान करण्यासाठी सर्वांना येण्याची इच्छा आहे. मात्र, संपूर्ण गंगेत कुठेही स्नान केलं तरी तेच पुण्य मिळेल असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. विशेष म्हणजे गर्दीमध्ये कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. 

हे वाचलं का?

प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन ते प्रयागराजकडे जाणाऱ्या कुंभमेळ्याच्या विशेष गाड्या रद्द थांबवण्यात आल्या आहेत. यामुळे जंक्शनवर प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची गर्दी असते.

हे ही वाचा >> 11 tigers died in Maharashtra : राज्यात 22 दिवसात 11 वाघांचा मृत्यू, MP च्या शिकारी टोळीचं काम?

वेगवेगळ्या मार्गांवर धावणाऱ्या कुंभमेळ्याच्या विशेष गाड्या नेहमीप्रमाणे सुरू आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शनवरून प्रयागराजला येणाऱ्या कुंभमेळ्याच्या विशेष गाड्याच थांबवण्यात आल्या आहेत. पण नियमित गाड्या सुरू आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शनवरून प्रयागराजला जाणाऱ्या फक्त कुंभमेळ्याच्या विशेष गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.

पंडित दीनदयाळ उपाध्याय रेल्वे विभागाचे कमर्शियल मॅनेजर मनीष कुमार म्हणाले की, पुढील आदेश येईपर्यंत विशेष ट्रेनचे प्रवास थांबवण्यात आले आहेत. कुंभमेळ्याच्या विशेष गाड्या सध्या तात्पुरत्या बंद राहतील. इतर ठिकाणांसाठी असणाऱ्या नियमित गाड्या सुरू राहतील. प्रयागराजमध्ये प्रचंड गर्दी असल्यानं विशेष ट्रेन थांबवण्यात आल्या आहेत.
 

हे ही वाचा >> Kumbh Mela Stampede : चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर PM मोदींचा योगी आदित्यनाथ यांचे 2 फोन
 

दुसरीकडे, प्रयागराज महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रशासन सतर्क झाले आहे. प्रयागराज जंक्शनवर रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) आणि पोलीस दलाची तैनाती वाढवण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून कडक व्यवस्था करण्यात आली आहे. मौनी अमावस्येच्या स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना संगमावर सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.