Kumbh Mela Stampede : चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर PM मोदींचा योगी आदित्यनाथ यांचे 2 फोन
पंतप्रधान मोदींनी या संदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी मोदींनी घटनास्थळी तात्काळ मदत करण्यासाठी सूचना दिल्या. कुंभ मेळ्यातील त्रिवेणी संगमावर स्थळावर रात्री उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कुंभ मेळ्यामध्ये मोठी चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू
प्रयागराजमधील दुर्घटनेनंतर PM मोदींचा योगींना फोन
शाही स्नान रद्द, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा यंत्रणेचा प्रयत्न
कुंभ मेळ्यातील त्रिवेणी संगमावर स्थळावर रात्री उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. संगमाजवळ अफवेमुळे चेंगराचेंगरी झाल्याचं बोललं जातंय. या अपघातानंतर, सर्व 13 आखाड्यांचे अमृत स्नान रद्द करण्यात आले आहे. कुंभमेळ्याती चेंगराचेंगरीनंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी तासाभरात दोन वेळा चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा >>Mahakumbh Stampede : कुंभमेळ्यामध्ये मोठी चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू झाल्याची सुत्रांची माहिती, शाही स्नान रद्द
पंतप्रधान मोदींनी या संदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी मोदींनी घटनास्थळी तात्काळ मदत करण्यासाठी सूचना दिल्या. तसंच मोदी स्वत: या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्री योगी यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिलं. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही मुख्यमंत्री योगी यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
हे ही वाचा >>Santosh Deshmukh Murder Case: 'धनंजय मुंडेंची ED चौकशी करा', थेट कोर्टातच...
दरम्यान आता, आखाड्यांचं अमृतस्नान वसंत पंचमीला होईल अशी माहिती आहे. प्रशासनाने आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरी यांना आखाड्यांचे शाहीस्नान सध्या तरी थांबवण्याचे आवाहन केलं होतं. त्यानंतर शाही स्नान रद्द करण्यात आलं आहे.
रात्री 2 वाजता हा अपघात झाला. संगम नाक्यावरील बॅरीयर्स तुटल्यानं ही चेंगराचेंगरी झाली. त्यानंतर ही दुर्घटना घडली. जखमींवर परिसरातील सेक्टर 2 मधील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अनेक मृतदेह प्रयागराज मेडिकल कॉलेजच्या शवागारात नेण्यात आले आहेत.
