Mahakumbh Stampede : कुंभमेळ्यामध्ये मोठी चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू झाल्याची सुत्रांची माहिती, शाही स्नान रद्द

मुंबई तक

13 जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत सुमारे 15 कोटी लोकांनी गंगा नदीत स्नान केलं आहे. आज दुसरं शाही स्नान पार पडणार होतं. यावेळी त्रिवेणी संगमावर आलेल्या गर्दीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कुंभमेळ्यामध्ये मोठी चेंगराचेंगरी

point

दुसरे शाही स्नान रद्द करण्याचा निर्णय

point

आखाडा परिषदेकडून चेंगराचेंगरीनंतर मोठा निर्णय

Mahakumbh Stampede Prayagraj : कुंभ मेळ्याच्या दुसऱ्या शाही स्नानापूर्वी म्हणजेच मौनी अमावस्येपूर्वी प्रयागराजच्या त्रिवेणी संगम परिसरात चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 10 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. विशेष खबरदारी घेत, आखाडा परिषदेने शाही स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Murder Case: 'धनंजय मुंडेंची ED चौकशी करा', थेट कोर्टातच...

संगम परिसरातून लोकांना बाहेर काढण्यासाठी बॅरिकेडिंग हटवण्यात आले आहे. पण तरीही नदीच्या काठावर अजूनही लोकांची तुफान गर्दी आहे. चेंगराचेंगरीनंतरही लोक संगमावर पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. साधू आणि संत लोकांना संगम परिसरात न जाण्याचं आवाहन करत आहेत.

हे ही वाचा >> सत्यनारायण पूजा, हळदी-कुंकू कार्यक्रमात राडा.. डोंबिवलीत परप्रांतियांची मुजोरी

13 जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत सुमारे १५ कोटी लोकांनी गंगा नदीत स्नान केलं आहे. आज म्हणजेच बुधवारी मौनी अमावस्येला 10 कोटींहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. मात्र, आता एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरातील गर्दी कमी ठेवण्याचं मोठं आवाहन यंत्रणांसमोर असणार आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना आवाहन केलं आहे की, गंगेच्या घाटावरच स्नान करा. संगमाकडे जाण्याचा प्रयत्न करू नका. स्नान करण्यासाठी अनेक स्नानघाट बांधले गेले आहेत. स्नान कुठेही करता येईल. प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा. व्यवस्था करण्यात मदत करा. कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका.